Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > प्लास्टिकच्या बाटलीत किंवा डब्यात लसूण लावण्याची पाहा युक्ती, ताजी लसूणपात-सुगंधी लसूण मिळेल घरीच

प्लास्टिकच्या बाटलीत किंवा डब्यात लसूण लावण्याची पाहा युक्ती, ताजी लसूणपात-सुगंधी लसूण मिळेल घरीच

Ghari lasun lanyachi sopi padhat: Kitchen garden tips in marathi: कमीत कमी जागेत आणि अगदी शून्य खर्चात लसूण कसा उगवायचा,पाहूया सोपी पद्धत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2026 18:00 IST2026-03-20T18:00:00+5:302026-03-20T18:00:03+5:30

Ghari lasun lanyachi sopi padhat: Kitchen garden tips in marathi: कमीत कमी जागेत आणि अगदी शून्य खर्चात लसूण कसा उगवायचा,पाहूया सोपी पद्धत.

How to grow garlic in plastic bottles Growing garlic from cloves in containers Best way to grow garlic greens at Home Home gardening hacks for beginners Plastic batlit lasun kasa lavava | प्लास्टिकच्या बाटलीत किंवा डब्यात लसूण लावण्याची पाहा युक्ती, ताजी लसूणपात-सुगंधी लसूण मिळेल घरीच

प्लास्टिकच्या बाटलीत किंवा डब्यात लसूण लावण्याची पाहा युक्ती, ताजी लसूणपात-सुगंधी लसूण मिळेल घरीच

स्वयंपाकघरातील फोडणी असो किंवा आरोग्यासाठी औषधी उपयोग. लसूण हा आपल्या रोजच्या जगण्याचा भागच आहे. पण सध्या बाजारात लसणाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.(Ghari lasun lanyachi sopi padhat) अशावेळी आपण घरी लसूण पिकवला तर? अनेकांना असं वाटतं की लसूण लावण्यासाठी मोठी जागा किंवा शेती लागते. पण आपण अगदी छोट्याशा कुंडीत, बाल्कनीत, खिडकी किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये लसणाची लागवड करु शकतो. (Kitchen garden tips in marathi)
आपल्या घरात असलेल्या टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या, रिकामे डबे किंवा साध्या पिशव्यांचा वापर करून आपण  लसूण आणि हिरवीगार लसूण पात मिळवू शकतो.(Garlic planting in plastic bottle marathi) कमीत कमी जागेत आणि अगदी शून्य खर्चात लसूण कसा उगवायचा,पाहूया सोपी पद्धत. 

काखेतील काळपटपणा- दुर्गंधीपासून मिळेल सुटका! १० रुपयांत घरीच करा नॅचरल रोल-ऑन, घामाचा वासही होईल कमी

लसूण लागवडीचे साहित्य 

२ किंवा ५ लिटरची रिकामी प्लास्टिकची बाटली
सुपीक माती, थोडे शेणखत किंवा गांडूळ खत 
लसणाच्या पाकळ्या 
छिद्र पाडण्यासाठी गरम खिळा. 

लसणाचे रोप कसे लावाल?

1. सगळ्यात आधी प्लास्टिकची बाटली स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर बाटलीच्या सर्व बाजूंनी २ ते ३ इंचाच्या अंतरावर छोटे-छोटे गोल छिद्र पाडा. हे छिद्र लसणाच्या पाकळीच्या आकारानुसार असायला हवं.बाटलीच्या तळाला पाण्याचा निचरा होण्यासाठी ३ -४ मोठी छिद्रे पाडायला विसरु नका. 

2. आता बाटलीमध्ये माती आणि खताचे मिश्रण घाला. माती जशी त्यात भरली जाईल तसं प्रत्येक छिद्रापर्यंत माती नीट दाबा, ज्यामुळे लसणाची पाकळी तिथे स्थिर राहिल. आता प्रत्येक छिद्रामध्ये एक लसणाची पाकळी अशा प्रकारे टाका की, तिचा टोकदार भाग बाहेरच्या बाजूला असेल आणि मुळाचा भाग मातीत जाईल. 

3. ही बाटली किंवा कुंडीत बाल्कनीत किंवा खिडकीत ठेवा. ज्यामुळे दिवसातून किमान ४ ते ५ तास ऊन मिळेल. बाटलीच्या वरच्या तोंडातून हळूवारपणे पाणी द्या. माती नेहमी ओलसर राहील याची काळजी घ्या, पण जास्त पाणी साचू देऊ नका. अवघ्या १० ते १५ दिवसांत हिरवीगार पात मिळायला सुरुवात होईल. जी आपण चटणी किंवा भाजीसाठी आपण वापरु शकतो. ४ ते ५ महिन्यांनंतर जेव्हा लसणाची पाने पिवळी पडू लागतील, तेव्हा बाटलीतून पूर्णपणे तयार झालेला लसूण काढू शकता.

 

 

Web Title : घर पर लहसुन उगाएं: प्लास्टिक की बोतलों में आसान उपाय!

Web Summary : बढ़ती लहसुन की कीमतों को मात दें! पुनर्नवीनीकरण प्लास्टिक की बोतलों का उपयोग करके घर पर ताजा लहसुन और साग उगाएं। सरल उपाय कम लागत और जगह के साथ एक संपन्न रसोई उद्यान सुनिश्चित करते हैं। महीनों में फसल!

Web Title : Grow Garlic at Home: Easy Planting Tips in Plastic Bottles!

Web Summary : Beat rising garlic prices! Grow fresh garlic and greens at home using recycled plastic bottles. Simple steps ensure a thriving kitchen garden with minimal cost and space. Harvest in months!