Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > ७ दिवसांत घरच्या छोट्या कुंडीत वाढेल हिरवीगार कोथिंबीर, खास ट्रिक- चमचाभर धणे पेरण्याची सोपी पद्धत

७ दिवसांत घरच्या छोट्या कुंडीत वाढेल हिरवीगार कोथिंबीर, खास ट्रिक- चमचाभर धणे पेरण्याची सोपी पद्धत

Kitchen Gardening Tips: Coriander from Seeds: पाहूया घरच्या घरी कोथिंबीर लावण्यासाठी काय करावं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2026 15:29 IST2026-03-24T15:28:26+5:302026-03-24T15:29:13+5:30

Kitchen Gardening Tips: Coriander from Seeds: पाहूया घरच्या घरी कोथिंबीर लावण्यासाठी काय करावं.

How to grow coriander in 7 days Best way to plant coriander seeds at home Growing coriander in pots for beginners Summer coriander planting tips Secrets to grow lush green coriander | ७ दिवसांत घरच्या छोट्या कुंडीत वाढेल हिरवीगार कोथिंबीर, खास ट्रिक- चमचाभर धणे पेरण्याची सोपी पद्धत

७ दिवसांत घरच्या छोट्या कुंडीत वाढेल हिरवीगार कोथिंबीर, खास ट्रिक- चमचाभर धणे पेरण्याची सोपी पद्धत

भारतीय स्वयंपाकात कोथिंबिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रस्सा भाजी असो वा पोहे, वरून पेरलेली ताजी कोथिंबीर जेवणाची लज्जत वाढवते. अनेकदा आपण बाजारातून कोथिंबीर आणतो, पण ती दोन दिवसांतच सुकते किंवा उन्हाळ्यात तिचे भाव प्रचंड वाढतात. बाजारात कोथिंबीरीचे भाव कधी गगनाला भिडतील याचा नेम नसतो.(Step-by-step coriander guide) उन्हाळ्यात तर कोथिंबीर मिळणे कठीण आणि महाग होते. अशा वेळी घरच्या बाल्कनीत किंवा खिडकीत लावलेली ताजी, सुगंधी कोथिंबीर केवळ पैशांची बचत करत नाही, तर जेवणाची लज्जतही वाढवते.(Kothimbir planting in Marathi) अनेकांची तक्रार असते की, धणे पेरतो पण कोथिंबीर उगवत नाही किंवा ती लवकर जळून जाते.
पण व्यवस्थित पद्धतीने कोथिंबीर लावल्यास आठवड्याभरात ताजी फ्रेश कोथिंबीर मिळेल. एक चमचा धणे वापरून अवघ्या ७ दिवसांत आपली छोटी कुंडी हिरव्यागार कोथिंबिरीने गच्च भरून जाईल.(Grow Coriander at Home) कोथिंबीर उगवण्यासाठी लागणारी माती, धणे पेरण्याची योग्य पद्धत आणि उन्हाळ्यात व्यवस्थित काळजी घेतल्यास हिरवीगार कोथिंबीर मिळेल. पाहूया घरच्या घरी कोथिंबीर लावण्यासाठी काय करावं. 

भाज्यांच्या सालीत दडलंय गुलाबाच्या सौंदर्याचं गुपित, रोपट्याला येतील भरपूर फुले, सोपा उपाय- उन्हाळ्यात रोप सुकणारही नाही

सगळ्यात आधी धने उन्हात वाळवून घ्या. नंतर दगडाने किंवा हाताने जाडसर कुटा, ज्यामुळे त्याचे दोन तुकडे होतील. त्यानंतर धने रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ते पेरणीसाठी तयार होतील. अख्ख्या बियांपेक्षा तुटलेल्या बिया लवकर आणि जास्त प्रमाणात रुजतात. उन्हाळ्यात जेव्हा कोथिंबीरी उगवण्यासाठी धणे पेरत असाल तर सगळ्यात आधी १२ ते २४ तास पाण्यात भिजवून ठेवा. 

कोथिंबीर वाढण्यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी माती निवडायला हवी. कोथिंबीरीची मुळे फार खोलवर जात नाही,त्यामुळे आपल्याला जास्त खोल कुंडीची गरज नाही. एखादा पसरट टब, प्लास्टिक ट्रे किंवा १० ते १२ रुंदीची कुंडी निवडा. माती तयार करताना त्यात ५०% बागेतील माती, ३०% शेणखत किंवा गांडूळ खत आणि २०% वाळू किंवा कोकोपीट मिसळा. माती भुसभुशीत असावी जेणेकरून पाण्याचा निचरा नीट होईल आणि मुळांना हवा मिळेल.

आता कुंडीतील माती थोडी ओलसर करुन घ्या. त्यावर भिजवलेले धणे पसरवा. एकाच जागी खूप धणे पसरवू नका. त्यावर थोडी माती घाला. धणे जास्त खोल जाणार नाही याची काळजी घ्याल. नाही तर तरे कुजतील. पेरणी झाल्यानंतर हाताने किंवा स्प्रे बॉटलने हलके पाणी शिंपडा. 

कोथिंबीरीच्या रोपाला ३ ते ४ तास कोवळे ऊन मिळणं जास्त गरजेचे आहे. उन्हाळ्यात दुपारी १२ नंतर कुंडीत कडक उन्हात ठेवू नका. मातीचा वरचा थर सुकला की लगेच पाणी द्या. माती नेहमी ओलसर असावी पण त्यात चिखल होऊ देऊ नका.

कोथिंबीरीचे रोप थोडे मोठी झाल्यावर पाण्यात थोडे ताक मिसळून ते पाणी शिंपडा. यामुळे कोथिंबीर अधिक हिरवीगार होते आणि तिला छान सुगंध येतो. साधारण २५ ते ३० दिवसांनी कोथिंबीर कापणीसाठी तयार होते. कोथिंबीर मुळासकट उपटू नका, तर ती कात्रीने वरून कापून घ्या. यामुळे त्याच रोपाला पुन्हा पालवी फुटते, ज्यामुळे भरपूर कोथिंबीर मिळते. 
 

Web Title : 7 दिनों में घर पर उगाएं हरी धनिया: आसान तरीका।

Web Summary : घर पर आसानी से धनिया उगाएं! कुटी हुई धनिया के बीजों को रात भर भिगोएं, अच्छी जल निकासी वाली मिट्टी का उपयोग करें, नियमित रूप से पानी दें और केवल 7 दिनों में भरपूर फसल के लिए आंशिक धूप प्रदान करें। काटे, उखाड़े नहीं।

Web Title : Grow lush coriander at home in 7 days: Easy guide.

Web Summary : Grow coriander at home easily! Soak crushed coriander seeds overnight, use well-draining soil, water regularly, and provide partial sunlight for a bountiful harvest in just 7 days. Cut don't uproot.