Join us

छोट्याशा कुंडीत बोगनवेलियाचं झाड वाढवण्याची सोपी ट्रिक, बाल्कनीत बहरतील रंगबेरंगी फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2025 17:15 IST

bougainvillea in pots: grow bougainvillea at home: bougainvillea care tips: अनेकदा प्रश्न पडतो की, हे रोप आपण घराच्या बाल्कनीत लावू शकतो का? घरच्या बाल्कनीत हे झाड कसे लावायचे पाहूया.

बोगनवेलिया म्हणजे खरं तर फुलांचा राजा. कमी पाणी, कमी माती आणि कमी काळजी घेऊनही हे झाड भरपूर फुलं देतं.(Gardening Tips) दिसायला रंगीत, शोभिवंत आणि जरा वेगळंच. त्यामुळेच आजकाल गार्डनिंग लव्हर्समध्ये याची खूप क्रेझ आहे.(bougainvillea in pots) हे झाडं आपल्या घरासह बाल्कनीचे सौंदर्य वाढवतात.(balcony gardening ideas) याच्या रंगबेरंगी फुलांसाठी हे ओळखले जाते. पण अनेकदा प्रश्न पडतो की, हे रोप आपण घराच्या बाल्कनीत लावू शकतो का? घरच्या बाल्कनीत हे झाड कसे लावायचे पाहूया. (grow bougainvillea at home)

बोगनवेलियाचं झाड जमिनीत लावलं तर ते भरपूर पसरतं, पण छोट्याशा कुंडीत किंवा ग्रो बॅगमध्येही हे झाड मस्त बहरतं.(colorful flowers for balcony) त्यासाठी फक्त थोडीशी योग्य पद्धत आणि योग्य मातीची निवड महत्त्वाची असते. बोगनवेलिया सूर्यप्रकाश खूप आवडणारं झाड आहे.(flowering plants for small balcony)

छोट्याशा कुंडीत लावा वेलचीचे रोप, अंगणात दरवळेल वेलचीचा सुगंध- पाहा रोप लावण्याची सोपी पद्धत

बोगनवेलि लावण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक कुंडी घ्यावी लागेल. हे रोप आपण १२ ते १६ इंच कुंडीत लावू शकता. यात माती भरा. त्यानंतर मातीत शेणखत किंवा कंपोस्ट देखील घालू शकतो. यामुळे माती सुपीक होते. आपण हे रोप नर्सरीमधून आणून लावू शकतो. जर कलम लावत असाल तर ५ ते ६ इंच लांब, मजबूत आणि हिरवी फांदी घ्या. ती मातीत लावा आणि त्याला हलके पाणी द्या. जर आपण नर्सरीमधून झाड विकत घेत असू तर जास्त खोलवर कुंडीत रोवू नका. 

झाड लावण्यासाठी माती हलकी, पाण्याचा लवकर निचरा होणारी असली पाहिजे. जड चिकट माती असेल तर पाणी साठून झाडाची मुळे कुजू शकतात. बोगनवेलियासाठी बागेची माती, वाळू आणि कंपोस्ट अशा मिश्रणाची माती सर्वोत्तम असते. झाड लावल्यानंतर पहिले काही दिवस नियमित पाणी द्यावं, पण झाड एकदा व्यवस्थित स्थिर झालं की आठवड्यातून दोन-तीन वेळा पाणी पुरेसं असतं. फुलं येण्यासाठी झाडाला थोडं खतही द्यावं लागतं. महिन्यातून एकदा कंपोस्ट किंवा द्रवरूप सेंद्रिय खत घातलं की झाडाला नवा जोर येतो. शिवाय वेळोवेळी झाडाची छाटणी केली की नवीन फांद्या फुटतात आणि त्यावर भरपूर फुलं येतात. वर्षभरातून कधीही आणि हिवाळ्यात या झाडाला चांगला बहर येतो. 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स