आपल्या घरातल्या छोट्याशा बाल्कनीत, गॅलरीत किंवा अंगणात अनेक झाडे लावलेली असतात.(Betel leaf plant) दारात सुगंधित फुलांची किंवा बहरलेल्या वेली असतील तर घरही सुंदर दिसतं.(Grow betel leaf at home) पण जागेच्या अडचणींमुळे अनेकदा आपल्याला हवी ती झाडे लावता येत नाही.(Betel leaf in small pot) पण अशावेळी काही उपयोगात येणारी आणि छोटी झाडं लावली तर आपल्यालाही आनंद होतो.(Betel leaf plant care) विड्याचे पान हे भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. पूजेत, शास्त्रात, आयुर्वेदिक औषधांमध्ये, तसेच जेवणाच्या पानात याचा वापर केला जातो.(Betel leaf gardening tips)
विड्याची वेल लावण्यासाठी फार मोठी जागा लागत नाही. फक्त पुरेशी आर्द्रता आणि सूर्यप्रकाशात वेल वाढते. योग्य प्रमाणात माती, पाणी आणि व्यवस्थित काळजी घेतल्यास विड्याची वेल सुंदरपणे वाढते. जर आपल्याही घरात किंवा बाल्कनीत विड्याची वेल लावायची असेल तर काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा.
फक्त ५० दिवसांत घरच्या कुंडीतही येतील लालचुटुक गाजरे! १ खत घाला- पाहा कमाल
विड्याची रोपासाठी योग्य कुंडी आणि माती निवडणे खूप महत्त्वाचे आहे. रोपासाठी मातीची कुंडी सर्वोत्तम असते, कारण त्यात हवा चांगली राहते. मातीसाठी आपल्याला ५० टक्के बागेची माती आणि ५० टक्के गांडूळखत किंवा शेणखत यांचे मिश्रण बनवणे चांगले असते.
विड्याच्या वेलीला दाट आणि निरोगी करण्यासाठी कुंडीत २ ते ३ कलमे लावावीत. असं केल्याने वेल चांगली वाढेल. यामुळे कुंडीतील माती लवकर सुकत नाही आणि त्यात ओलावा राहतो. यामुळे वेल चांगल्याप्रकारे वाढते. कलम लावताना ते एकमेकांपासून थोडे लांब ठेवा.
विड्याच्या अर्थात सुपारीच्या वेलीला आधार देणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यामुळे ती सरळ आणि लांब वाढू शकेल. यासाठी मॉस स्टिक कुंडीत रोवा. ज्यामुळे ती पाणी शोषून घेईल आणि वेलीला ओलावा मिळेल. यामुळे वेल सरळ वाढेल, त्याची पाने देखील मोठी होतील. एप्सम मीठ, ह्युमिक अॅसिड आणि सीव्हीड अर्कची फवारणी वेलीसाठी टॉनिक म्हणून काम करेल. एप्सम मीठात मॅग्नेशियम असते, जे वेलीची पाने हिरवीगार करण्यास मदत करते. तर ह्युमिक अॅसिड मातीची गुणवत्ता सुधारते आणि सीव्हीड अर्क हे एक सेंद्रिय खत आहे जे वनस्पतींच्या वाढीस मदत करते.
वेलीची वाढ होण्यासाठी आपल्याला पुरेसे खत तर लागेलच पण त्याशिवाय पाणी आणि सूर्यप्रकाशाची काळजी देखील घ्यावी लागेल. त्यासाठी कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथून रोपाला हलका सूर्यप्रकाश मिळेल, ज्यामुळे वेलीची वाढ होईल.