Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > बाल्कनीतही लावता येईल तमालपत्राचं झाड, वाचा A to Z माहिती-सुगंधी तमालपत्र मिळेल घरच्याघरी

बाल्कनीतही लावता येईल तमालपत्राचं झाड, वाचा A to Z माहिती-सुगंधी तमालपत्र मिळेल घरच्याघरी

Tamalpatra jhadachi kalji kashi ghyavi: Kundit tejpatta lavnyachi paddhat: तमालपत्राचे झाड लावण्याची सोपी युक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2026 15:24 IST2026-03-17T15:22:53+5:302026-03-17T15:24:03+5:30

Tamalpatra jhadachi kalji kashi ghyavi: Kundit tejpatta lavnyachi paddhat: तमालपत्राचे झाड लावण्याची सोपी युक्ती

How to grow Bay Leaf in balcony Bay Leaf plant care tips for beginners Growing Tejpatta in pots at home Best soil for Bay Leaf plant Organic fertilizer for Bay Leaf Indoor herbs and spices gardening | बाल्कनीतही लावता येईल तमालपत्राचं झाड, वाचा A to Z माहिती-सुगंधी तमालपत्र मिळेल घरच्याघरी

बाल्कनीतही लावता येईल तमालपत्राचं झाड, वाचा A to Z माहिती-सुगंधी तमालपत्र मिळेल घरच्याघरी

भारतीय स्वयंपाकघरात तमालपत्र किंवा तेजपत्ता हा फक्त मसाला नसून ते औषध आहे. पुलाव असो वा रस्सा भाजी, तमालपत्राचा सुवास आपल्या पदार्थांची चव द्विगुणित करतो. पण बाजारात मिळणारे तमालपत्र अनेकदा जुने, सुकलेले किंवा धुळीने माखलेले असते.(Tamalpatra jhadachi kalji kashi ghyavi) त्यातील नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी झाल्यामुळे हवी तशी चव आणि आरोग्यदायी फायदे मिळत नाहीत. पण रोज फ्रेश आणि ताजे तमालपत्र हवे असेल तर.. (Kundit tejpatta lavnyachi paddhat)
घरच्या घरी कुंडीत तमालपत्राचे रोप लावणं ही अतिशय सोपी गोष्ट आहे. तमालपत्रामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि दाहशामक गुणधर्म असतात, जे पचन सुधारण्यास आणि श्वसनाच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. पण तमालपत्राचे रोप लावताना माती कशी असावी, खत कोणते द्यावे आणि कडक उन्हात त्याची काळजी कशी घ्यावी, याबद्दल अनेकांच्या मनात शंका असतात.(How to grow Bay Leaf in balcony) जर आपण बागेत तमालपत्राचे रोप लावत असू तर A to Z माहिती पाहूया, ज्यामुळे आपल्याला वर्षभर घरचा शुद्ध तमालपत्र आणि फ्रेश मसाल्याची चव चाखता येईल. (Ghari tamalpatra plantation tips)

फक्त ५ मिनिटं आणि ४ पदार्थ, नॅचरल फेसवॉश घरीच करा झटपट-पिंपल्स घालवणारा मस्त फेसवॉश

घरात तमालपत्र लावण्यासाठी कुंडीसाठी योग्य जागा निवडणं महत्त्वाचं आहे. तमालपत्राचे रोप हे उष्णकटिबंधीय हवामान, किंचित उबदार हवामानात उत्तम वाढतो. आपल्याला तमालपत्राची कुंडी अशा ठिकाणी ठेवावी लागेल जिथे ६ ते ८ तास सूर्यप्रकाश मिळेल. जर घरात वाढवत असाल, तर मोकळी बाल्कनी, गच्ची किंवा खिडकीजवळची जागा निवडा. 

तमालपत्राचे रोप बियाण्यापासून उगवणं कठीण असतं. त्यासाठी नर्सरीमधून चांगले रोप विकत आणणे केव्हाही उत्तम. सगळ्यात आधी आपल्याला किमान १८ ते २४ इंचाच्या मोठ्या पिंपात किंवा मोठी कुंडी निवडावी लागले. या झाडाची मुळे वेगाने वाढतात. कुंडीला तळाशी पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र असणं गरजेचं आहे.  यासाठी आपल्याला ५० टक्के बागेतील माती, ३० टक्के कंपोस्ट किंवा शेणखत आणि २० टक्के वाळूचे मिश्रण तयार करावं लागेल. यामध्ये थोडे कडुनिंबाचे पेंड मिसळल्यास मुळांना कीड लागणार नाही. 

भरपूर उन्हामध्ये हे रोप ठेवणं टाळा. उन्हाळ्यात हे रोप सावलीत ठेवावे, या रोपाला कोवळ ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा. कुंडीतील माती नेहमी ओलसर असावी, पण त्यात पाणी साचू देऊ नका. उन्हाळ्यात दररोज पाणी द्या, तर हिवाळ्यात माती कोरडी दिसल्यास पाणी घालावं. दर ३ ते ४ महिन्यांनी थोडे गांडूळ खत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट दिल्यास झाडाची वाढ जोमाने होते. रोपाची वाढ झाल्यानंतर २ ते ३ वर्षांचे झाल्यावर त्याची पाने तोडा. पाने तोडल्यानंतर सावलीत वाळवून हवाबंद डब्यात साठवल्यास त्यांचा सुवास दीर्घकाळ टिकतो. 

Web Title : घर पर उगाएं तेज पत्ता: अपनी बालकनी के लिए एक संपूर्ण गाइड

Web Summary : घर पर तेज पत्ता उगाना आसान है। सही मिट्टी का मिश्रण इस्तेमाल करें, धूप सुनिश्चित करें और उचित रूप से पानी दें। ताज़े तेज पत्ते स्वाद बढ़ाते हैं और स्वास्थ्य लाभ प्रदान करते हैं। सर्वोत्तम परिणामों के लिए एक पौधा से शुरुआत करें।

Web Title : Grow Bay Leaf at Home: A Complete Guide for Your Balcony

Web Summary : Growing bay leaf at home is easy. Use the right soil mix, ensure sunlight, and water appropriately. Fresh bay leaves enhance flavor and offer health benefits. Start with a sapling for best results.