बऱ्याचदा असं होतं की आपण लावलेल्या रोपाच्या कुंडीतल्या मातीत खूप मुंग्या होतात. मुंग्यांमुळे तयार झालेली कित्येक छोटी छोटी छिद्रं त्या मातीवर दिसतात. मुंग्यांचं प्रमाण वाढलं तर त्या रोपांची मुळं खराब तर करतातच.. पण रोपांवरही चढतात. बारीक कळ्या, कोवळी पानं खातात. यामुळे मग रोपांची चांगली वाढ होत नाही. कळ्या खराब झाल्याने फुलंही येत नाहीत. त्यामुळे रोपांचं नुकसान होऊ नये म्हणून मुंग्यांचा इलाज करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी काय करायचं याची ही खास माहिती..(how to get rid of ants in plant soil?)
कुंडीतल्या मातीमध्ये मुंग्या झाल्या असतील तर काय करावं?
हा उपाय करण्यासाठी आपण स्वयंपाक घरातलेच सगळे पदार्थ वापरणार आहोत. शिवाय हा उपाय करताना आपल्या रोपाला कुठेही इजा पोहोचणार नाही, याचीही काळजी घ्यावी.
एका भांड्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा हळद, १ चमचा दालचिनी पावडर आणि १ चमचा मिरेपूड घ्या.
झाडूसारखे रखरखीत केस होतील रेशमासारखे मऊ, चमकदार! २ सोपे उपाय- केसांवर येईल चमक
त्यामध्ये १ लीटर पाणी घालून सगळं पाणी व्यवस्थित हलवून घ्या. आता हे पाणी कुंडीतल्या मातीत घाला. २ ते ३ दिवसांतून एकदा हा उपाय करा. मातीमधल्या मुंग्या लगेच कमी होतील.
हे उपायही करून पाहा
१. कडुलिंबाचं तेल
हा उपाय करण्यासाठी १ लीटर पाण्यामध्ये १ ते २ चमचे कडुलिंबाचं तेल घाला. आता हे मिश्रण कुंडीतल्या मातीमध्ये टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय करून पाहा.
हिवाळ्यात हाडांचं कुरकुरणं सुरू होण्याआधीच 'या' पद्धतीने मनुका खा! हाडांची दुखणी पळून जातील
२. साबणाचं पाणी
साबणाचं पाणी वापरूनही मातीमधल्या मुंग्यांचं प्रमाण कमी करता येतं. हा उपाय करण्यासाठी साबणाचा फेस तयार करा. हा फेस कुंडीमधल्या मातीमध्ये टाका. यामुळेही मुंग्या कमी होतात. पण रोपाच्या मुळांना इजा होईल असा खूप हार्श साबण वापरू नये.
