Join us

गुलाबाचे रोप वाढले पण फुले येत नाहीत? खत म्हणून घाला १ गोष्ट, भरपूर येतील फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2024 19:31 IST

How to Fertilize Roses for Beautiful Flowering Bushes : गुलाबाचे रोपटे वाढत नसेल किंवा त्याला फुलं येत नसतील, तर एक उपाय करून पाहा

लाल, गुलाबी, रंगीबेरंगी रंगाचे गुलाब (Rose) कोणाला नाही आवडत. सुगंधित गुलाब आपण भेट म्हणून देतो, किंवा केसात माळतो. बरेच जण आवड म्हणून कुंडीत गुलाबाचे रोप लावतात. पण योग्य काळजी न घेतल्यास रोपट्याला पानं जास्त पण गुलाब कमी येतात. गुलाबाच्या रोपट्याची विशेष काळजी घ्यावी लागते. जर नियमित त्याची काळजी न घेतल्यास रोपटे सुकते, किंवा रोपट्याला फुलं येत नाही (Gardening Tips).

गुलाबाच्या रोपट्याला फुले येत नसतील तर, अशा वेळी काय करावे? गुलाबाच्या रोपट्याची काळजी कशी घ्यावी? रोपट्याला भरपूर गुलाबाची फुले यावी यासाठी मातीत नक्की काय मिसळावे? पाहा(How to Fertilize Roses for Beautiful Flowering Bushes).

मातीत मिसळा एक खास गोष्ट

गुलाबाच्या रोपट्याला फुलं येत नसतील, तर रोपटे लावण्यापूर्वी मातीत शेणखत मिसळा. शिवाय रोपटे लावण्यासाठी आपण लाल किंवा काळ्या मातीचा वापर करू शकता. यामुळे रोपट्याला फुलं येतील, शिवाय रोपट्याची वाढ योग्य होईल.

झाड खूप मोठे पण लिंबू लागत नाहीत? पाण्यात मिसळा एक पिवळा पदार्थ, येतील भरपूर लिंबू

रोपटे कुठे ठेवाल?

रोपटे लावल्यानंतर त्यांची पुरेपूर काळजी घेणं गरजेचं आहे. रोपट्यांना वेळोवेळी सूर्यप्रकाश, खत आणि पाणी लागते. पण अतिप्रमाणात रोपट्यांना या गोष्टी देणं टाळावे. शिवाय गुलाबाचे रोपटे थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणार नाही, अशा ठिकाणी ठेवावे.

पाणी शिंपडा

गुलाबाच्या झाडांना स्प्रिंकलरद्वारे पाणी द्या. थेट पाणी न घालता रोपट्यांवर पाणी शिंपडा. यामुळे रोपट्यांची योग्य वाढ होईल, शिवाय रोपट्याला सुरेख फुलंही येतील. यासह पिवळी पानं छाटून काढा. यामुळे फुलांना नवी पालवी फुटेल.

घरातल्या लहानशा कुंडीतही लावता येईल मिरचीचं रोप, मातीत मिसळा १ खास गोष्ट, भरपूर येतील मिरच्या

कुंडीची निवड

गुलाब कुंडीत न लावता जमिनीमध्ये लावल्यास त्याची वाढ छान होते. पण त्याला अगदी चिटकून खूप झाडं लावू नका. दोन रोपांमध्ये जागा ठेवा. जर आपण कुंडीमध्ये गुलाब लावत असाल तर, आकाराने मोठी कुंडीची निवड करा. मोठ्या कुंडीमध्ये रोपटे लावल्यास गुलाबाची छान वाढ होईल.

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल व्हायरल