Join us
Daily Top 2Weekly Top 5

नर्सरीतून आणलेलं रोप लावताना परफेक्ट कुंडी कशी निवडाल? फुलं न येताच रोप सुकतं कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2024 08:00 IST

कमी जागेत-गॅलरीत रोपं लावताना योग्य आकाराची कुंडी निवडणंही गरजेचं आहे.

ठळक मुद्देकोणत्या झाडाला किती ऊन लागतं ते समजून त्याप्रमाणे उन्हात ठेवा.

आपण नर्सरीतून हौशीने एखादं रोप आणतो. फुलझाडांचं. आणताना ते रोप अगदी कळ्यांनी फुलांनी डवरलेलं असतं. आपण प्रेमानं ते कुंडीत लावतो. रोज पाणीही टाकतो. पण काहीच दिवसात फुलं सुकतात, कळ्या गळतात. रोप मरुन जातं. कळत नाही असं का झालं? त्याची अनेक कारणं असूच शकतात पण आपली कुंडी निवडताना चूक होते का हा मुलभूत प्रश्न आधी सोडवायला हवा. चुकीची कुंडी निवडली आणि रोप गडबडीत लावलं की ते न जगण्याची शक्यताच जास्त. म्हणून काय काळजी घ्याल?

रोप लावताना लक्षात ठेवा..

रोप लावताना घ्यायची काळजी..१. नर्सरीतून आणलं की लगेच रोप लावायची घाई करु नका. घरी आणलं की त्याला पाणी घाला. ३-४ तास ते रोप पाणी घालून ठेवा. २. नर्सरीतून आणलेल्या रोपाचा आकार पाहा, ती पिशवी पाहा. त्यापेक्षा आपली घरची कुंडी किमान दुप्पट तरी मोठी हवी.३. नर्सरीतून आणलेलं रोप जर प्लास्टिकच्या बॅगमध्ये असेल तर ती बॅग सरळ कापता येते. पण रोप जर कुंडीत असेल तर अशावेळी ती कुंडी आडवी करून तीन- चार वेळा जमिनीवर हळूवार आपटा. जेणेकरून कुंडीतील माती सैल होईल आणि रोप बाहेर येणं सोपं होईल.

(Image :g00gle) ४. रोप उपटून मग पुन्हा लावू नका. त्यानं धरलेल्या मातीसह लावा.५ ज्या कुंडीत रोप लावणार आहात, ती आधी तयार करून घ्या. त्या कुंडीला छिद्र आहेत ना ते पहा. नसेल तर पाडून घ्या. माती, कोकोपीट, खत, वाळू, वाळलेली पाने, नारळाच्या शेंड्यांचा चुरा असं कुंडीत टाकून ठेवा. कुंडीच्या मधोमध एक खड्डा राहू द्या. आपण आणलेलं रोप या मधल्या जागेत व्यवस्थित बसवा. त्यानंतर आजूबाजूने माती टाका.६. कुंडी काठोकाठ भरून कधीही माती टाकू नये. दोन ते तीन बोटांची जागा नेहमी रिकामी ठेवावी.

(Image :g00gle) ७. थोडंच पाणी घाला. जास्त पाणी घालू नका.८. नुकतंच लावलेलं रोप कडक उन्हात ठेवू नका. सुरुवातीला दोन- तीन दिवस कमी ऊन लागेल अशा जागेत ठेवा. ९. कोणत्या झाडाला किती ऊन लागतं ते समजून त्याप्रमाणे उन्हात ठेवा.१०. रोपाची रोज काळजी घ्या. दुर्लक्ष करु नका. 

टॅग्स :बागकाम टिप्स