Join us

थंडीत रोपांभोवती मुंग्यांच्या रांगा दिसतात? कुंडीत ४ घरगुती पदार्थ घाला, मुंग्या जातील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2025 09:55 IST

Homemade Ant Killing Solution For Plants In Winters : A Home Remedy For Ants In Your Garden : How to remove ants from plants naturally : How to make homemade pesticide for ants : Homemade Ant Killing Solution : रोपांच्या मुळाशी किंवा कुंडीत असणाऱ्या मुंग्या पळवून लावण्यासाठी कोणते घरगुती पदार्थ वापरावेत ?

थंडीचा सिझन हा रोपं लावण्यासाठीचा सर्वात उत्तम ऋतू आहे असे म्हटले जाते. या दिवसांत रोपांची लागवड केल्याने त्यांची विशेष अशी फारशी काळजी घ्यावी लागत नाही. याचबरोबर, थंडीच्या दिवसांत लावलेली रोपं (A Home Remedy For Ants In Your Garden) पुढील वर्षभर अगदी फळा - फुलांनी बहरुन येतात, त्यांची वाढ देखील चांगली होते. एकूणच काय तर हिवाळा ऋतू सगळ्याच रोपांसाठी अतिशय अनुकूल असतो. थंडीचे दिवस हे रोपांच्या (How to make homemade pesticide for ants) लागवडीसाठी किंवा वाढीसाठी आवश्यक (Homemade Ant Killing Solution) असले तरीही रोपांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. हिवाळ्यात वातावरणातील गारठ्याने रोपांवर अनेक रोग पडतात किंवा अनेक प्रकारच्या लहानसहान समस्यांचा सामना करावा लागतो(Homemade Ant Killing Solution For Plants In Winters).

अनेकदा बहुतेक जणांची अशी तक्रार असते की, हिवाळ्यात रोपांच्या मुळांशी किंवा कुंडीतील रोपांच्या वरच्या भागावर मुंग्या येऊन चिकटून बसतात. अशा मुंग्या रोपांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. या मुग्यांना घालवण्यासाठी केमिकल्सयुक्त कीटकनाशक किंवा खतांचा वापर केल्यास रोपांच्या मुळांना इजा होऊ शकते, यामुळे रोपं कोमेजून जाऊ शकते. अशावेळी आपण रोपांच्या कुंडीतील किंवा मुळाशी असणाऱ्या या मुंग्या घालवण्यासाठी काही घरगुती नैसर्गिक पदार्थांचा वापर करु शकतो. रोपांच्या मुळाशी किंवा कुंडीत असणाऱ्या मुंग्या पळवून लावण्यासाठी कोणते घरगुती पदार्थ वापरावेत ते पाहूयात. 

रोपांच्या मुळाशी किंवा कुंडीत असणाऱ्या मुंग्या पळवून लावण्यासाठी.... 

१. कडुलिंबाचा पेंडा वापरा :- जर हिवाळ्यात मुंग्या घरातील झाडे किंवा इतर वनस्पतींना येऊन त्यांची नासधूस करु लागल्या तर काही मिनिटांत त्यांना काढून टाकण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा पेंडा हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. तुम्ही कोणत्याही खताच्या दुकानातून कडुलिंबाच्या पानांचा पेंडा खरेदी करू शकता. सगळ्यात आधी १  लिटर पाण्यात ४ ते ५ चमचे कडुलिंबाचा पेंडा टाकून चांगले मिसळा. आता हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरा. यानंतर हे द्रावण झाडांची मुळे, देठ, माती आणि पानांवर फवारावे. आठवड्यातून किमान दोनदा ही प्रक्रिया करा. कडुलिंबाच्या पानांच्या पेंड्याचा वास मुंग्यांना दूर पळवून लावतो. या फवारणीमुळे रोपांना इजा होत नाही आणि जमिनीसाठीही ते फायदेशीर ठरते.

पुदिन्याची जुडी विकत आणण्यापेक्षा कुंडीत लावा छोटंसं हिरवंगार पुदिन्याचं रोप, ताजा पुदिना मिळेल घरच्याघरीच...

२. बोरॅक्स पावडर :- रोपांना कोणत्याही कीटकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी बोरॅक्स पावडर हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. त्याचा वापर करून, वनस्पतीतील कीटकांपासून ते मुळांमधील मुंग्यांपर्यंत सर्व काही मिनिटांतच दूर करता येते. तुम्ही कोणत्याही कीटकनाशक किंवा खताच्या दुकानातून बोरॅक्स पावडर खरेदी करू शकता. सर्व प्रथम, १ लिटर पाण्यात ३ ते ४ चमचे बोरॅक्स पावडर चांगली मिसळा. हे मिश्रण तयार केल्यानंतर स्प्रे बाटलीत भरा. यानंतर, झाडाची मुळे, माती आणि पानांवर पूर्णपणे फवारणी करा. आठवड्यातून किमान २ वेळा ही प्रक्रिया करा. आठवड्यातून दोनदा या मिश्रणाची फवारणी केल्यास मिश्रणाच्या उग्र वासामुळे झाडांमधील मुंग्या पळून जातील.

३. दालचिनी पावडर वापरा :- दालचिनी ही अशी गोष्ट आहे जी जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात वापरली जाते. दालचिनी केवळ खाण्यासाठीच उपयोगी नाही तर मुंग्यांनाही रोपांपासून दूर ठेवू शकते. सर्वप्रथम, १ ते २ मग पाण्यात ३ ते ४ चमचे दालचिनी पावडर घाला आणि ते चांगले मिसळा. हे मिश्रण तयार केल्यानंतर स्प्रे बाटलीत भरावे. यानंतर, झाडाची माती, मुळे आणि पाने यावर पूर्णपणे फवारणी करा. ही प्रक्रिया आठवड्यातून दोनदा करा. आठवड्यातून दोनदा या मिश्रणाची फवारणी केल्यास द्रावणाच्या तीव्र वासामुळे झाडांमधील मुंग्या पळून जातील. 

कुंडीतील मातीत मिसळा मूठभर गूळ, रोपांची वाढ होईल दुप्पट वेगाने- फळाफुलांचा येईल बहर.... 

४. बेकिंग सोडा वापरा :- बेकिंग सोडा एक असा पदार्थ आहे, ज्याचा वापर करून तुम्ही कोणत्याही ऋतूत अगदी काही मिनिटांतच मुंग्यांना रोपां पासून दूर नेऊ शकता. यासाठी सर्वप्रथम १ लिटर पाण्यात २ ते ३ चमचे बेकिंग सोडा टाकून चांगले मिसळा. यानंतर हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरून ते झाडांवर पूर्णपणे फवारावे. जर तुम्ही आठवड्यातून दोनदा मिश्रण फवारले तर मुंग्या झाडांपासून दूर पळून जातील किंवा मरतील.

कुंडीतील रोपांसाठी शेणखत वापरण्याची योग्य पद्धत, रोपं फळाफुलांनी येतील बहरून...

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सहोम रेमेडी