Join us

जास्वंदाच्या झाडाला येतील भरपूर फुलं; फक्त बटाट्याचा करा 'असा' वापर; रोप वाढेल जोमानं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2024 17:35 IST

Hibiscus Tree: Facts, Growing Conditions & Care : कुंडीतल्या झाडाची वाढ होण्यासाठी रासायनिक खतं कशाला, हा करा खास उपाय

बाल्कनीची शोभा वाढवण्यासाठी आपण बागकाम करतो (Gardening). विविध प्रकारची रोपे लावतो. आणि रोपांची काळजीही घेतो (Hibiscus Tree). पण बऱ्याचदा रासायनिक खतांमुळे रोपाची वाढ होत नाही (Growing). रोपाची वाढ खुंटते. यासह पानं पिवळी होतात, गळतात. मुख्यतः थंडीत रोप खराब होते. फुलझाडांसाठी महागड्या खतांची गरज नसते. अनेकांच्या घरात जास्वंदाचे रोप असते. पण जास्वंदाच्या रोपाची अनेकदा वाढ खुंटते. त्यावर दोन वेळा पाणी आणि महागडे खत घालूनही जास्वंदाचे रोप वाढत नाही.

जर आपल्याला रासायनिक - महागडे खतांचा वापर करायचा नसेल तर, आपण बटाट्याचा वापर करून खत तयार करू शकता. या खताचा वापर केल्याने कळ्या छान फुलतील. शिवाय झाड हिरव्यागार पानांनी बहरेल. पण बटाट्याचा खत नेमकं कसं तयार करावे? यामुळे झाडाची योग्य वाढ होऊ शकेल का?(Hibiscus Tree: Facts, Growing Conditions & Care).

दूध पचत नाही- दूध प्यायले तर ॲसिडिटीचा त्रास वाढतो? दुधात घाला ५ गोष्टी; दूध पचेल सहज

कुंडीतल्या जास्वंदाच्या रोपाची नेमकी काळजी कशी घ्यावी?

- सर्वात आधी कच्चे बटाटे सोलून घ्या. नंतर मिक्सरचं भांडं घ्या. त्यात कच्च्या बटाट्याचे तुकडे घालून पेस्ट तयार करा.

- तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. जितकं बटाट्याची पेस्ट आहे. त्याच्या पाचपट पाणी त्यात मिसळा.

- तयार पाणी कुंडीतल्या मातीत मिसळा. यामुळे झाडाची योग्य वाढ होईल. यासह जास्वंदाच्या कळ्या छान फुलतील.

- जर जास्वंदाच्या रोपाच्या भोवतीने किडे किंवा मुंग्या फिरत असतील तर, एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरा. त्यात कडूलिंबाची पावडर मिसळा.

- तयार कडूलिंबाचं पाणी झाडावर फवारणी करा. यामुळे झाडाभोवती कीड किंवा मुंग्या लागणार नाही.

- जास्वंदाच्या झाडाच्या वाढीसाठी आणि भरपूर फुले येण्यासाठी चहा पावडरचाही वापर करू शकता. चहा पावडरमध्ये पोटॅशियम, नायट्रोजन, फॉस्फरस यांसारखे घटक जास्त प्रमाणात असतात.

तेलाचा एक थेंबही न वापरता करा ८ प्रकारचे सूप, थंडीत रोज प्या गरमागरम सूप-वजन करा कमी!

- कुंडीतील माती अॅसिडिक बनवण्याचं काम चहा पावडरमुळे होतं. ज्यामुळे कुंडीतल्या झाडाची योग्य वाढ होते.

- यासाठी चहा पावडर धुवून सुकवून घ्या, याचा वापर आपण खत म्हणूनही करू शकता. यामुळे जास्वंदाच्या झाडाच्या वाढीस मदत होईल.     

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल व्हायरल