फुलझाडे लावण्याची आवड अनेकांना असते. जागेच्या अभावामुळे काही ठराविकच झाडे लावता येतात. (Hibiscus not flowering? 4 solutions, Hibiscus plant will bloom with gorgeous flowers in 10 days)त्यापैकी एक म्हणजे जास्वंदीचे झाड. अगदी लहान जागेतही वाढते आणि मस्त मोकळ्या बागेतही बहरते. फक्त योग्य ती काळजी घ्यावी लागते. जास्वंदीला बाराही महिने फुले येतात. कायम झाड छान बहरलेले नसते मात्र एखादं फुल कायम येते. पण त्यासाठी त्याची तशी निगराणी करावी लागते. तुम्ही लावलेल्या झाडाला हवी तेवढी फुले लागत नाहीत का? मग पाहा काय चुकते आहे. जास्वंद लावायची योग्य पद्धत काय आहे आणि काळजी कशी घ्यायची ते जाणून घ्या.
१. झाडाला उरलेले कुठले तरी गढूळ पाणी देऊ नका. अनेक जण असे करतात. खराब पाणी दिले तर झाड चांगले वाढणारच नाही. (Hibiscus not flowering? 4 solutions, Hibiscus plant will bloom with gorgeous flowers in 10 days)त्यालाही आरोग्य असते. चांगले पाणीच द्यावे. दूषित खराब पाणी द्यायचे. नाही. वेळोवेळी पाणी द्यायचे. रोज दिवसातून एकदा पाणी घाला.
२. जास्वंदीच्या फांद्या झटपट वाढतात. त्यांना छाटणीची गरज असते. फांद्या वेळोवेळी कापायच्या म्हणजे नवीन ताज्या फांद्या येतात. त्यामुळे फुलेही छान येतात. फांद्या नव्या फुटल्यावर फुलांची संख्या वाढते. रोगट फांद्या ठेवायच्या नाहीत. पांढर्या झालेल्या बुरसट फांद्या लगेच कापा. जास्वंदीवर मेलीबग्स तसेच अळी असते. इतरही काही कीटक असतात. त्यांसाठी योग्य ते उपाय करावे कीटकनाशकांचा वापर करावा.
३. दर सहा महिन्यांनी कुंडीतील माती बदलायची. नर्सरीतील पौष्टिक माती आणा किंवा चांगली सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध आम्लीय माती जास्वंदासाठी योग्य असते. त्यानुसार माती वापरावी.
४. जास्वंदीसाठी केळीच्या सालाचे खत पौष्टिक असते. तसेच चहा पूड घातलेले पाणी चांगले ठरते. चहा विकळवायचा गार झाल्यावर गाळून घ्यायचा आणि पाण्यासारखाच झाडाला घालायचा. चांगली फुले येतात शिवाय झाडाच्या आरोग्यासाठी चांगले ठरते. रासायनिक फवारणी करण्यापेक्षा जैविक किटकनाशकांचा वापर करा. घरगुती उपाय करा. तसेच नैसर्गिक पदार्थ वापरा. कडूलिंबाचे तेल झाडासाठी चांगले असते. त्याचा वापर करा.
या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. म्हणजे फुले छान येतील. छान उजेडाच्या ठिकाणी झाड लावा सगळ्याच ऋतुंमध्ये मस्त बहरेल.