Join us  

बाग सदाबहार राहण्यासाठी ट्विंकल खन्ना करते 'हा' उपाय, ना झाडांवर कीड पडते ना बुरशी-पाहा ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2024 12:27 PM

Gardening Tips Shared By Twinkle Khanna: अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने तिच्या चाहत्यांसोबत काही गार्डनिंग टिप्स शेअर केल्या आहेत.

ठळक मुद्देती म्हणते की तुमच्या इनडोअर प्लांट्सवर रोग पडू नये म्हणून तिने सांगितलेला हा उपाय अतिशय उपयुक्त ठरू शकतो.

बॉलीवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे एक खरोखरच कमालीचं व्यक्तिमत्त्व आहे. अष्टपैलू म्हटलं तरी हरकत नाही. कारण एकाच वेळी तिने अनेक क्षेत्रांमध्ये तिची ओळख निर्माण केली आहे. नावाजलेली अभिनेत्री तर ती आहेच. पण लग्नानंतर तिने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वत:ला गुंतवून घेतले. ती लेखिका आहे, तिने नुकतीच डॉक्टरेट मिळवली आहे, इंटेरियर डिझायनिंगमध्येही तिचा इंटरेस्ट आहे आणि शिवाय गार्डनिंगचीही तिला खूप आवड आहे. (gardening tips shared by Twinkle Khanna)

 

या सगळ्या गोष्टी तर ट्विंकल खन्ना करतेच, पण त्याशिवाय ती सोशल मिडियाद्वारे तिच्या चाहत्यांसाेबत अनेक home hacks आणि DIY देखील शेअर करत असते.

कोणतंच खत न टाकताही झाडाला येतील भरभरून लिंबू, बघा उपाय- लिंबू वेचूनच दमून जाल...

काही दिवसांपुर्वी ती तिच्या लेकीकडून पियानो वाजवायलाही शिकत होती. अशा कित्येक नवनविन गोष्टी ती करते आणि त्याचे अपडेट्स सोशल मिडियावरून चाहत्यांना देते. असंच आता तिने तिच्या चाहत्यांसोबत काही गार्डनिंग टिप्स शेअर केल्या आहेत. स्वयंपाक घरातले पदार्थ वापरून आपण नेहमीच वेगवेगळ्या home hacks आणि DIY करत असतो. असंच काहीसं ट्विंकलनेही केलं आहे.

 

या पोस्टमध्ये ट्विंकलने १ खास उपाय सांगितला आहे. त्यामध्ये तिने व्हिनेगर वापरले आहे. ती म्हणते की तुमच्या इनडोअर प्लांट्सवर रोग पडू नये म्हणून तिने सांगितलेला हा उपाय अतिशय उपयुक्त ठरू शकतो.

बघा माय- लेकीची भन्नाट मजेशीर सवारी, घरबसल्याच लेकीला घडवली सहल- बघा व्हायरल व्हिडिओ

हा उपाय करण्यासाठी जर १ कप ॲपल साईड व्हिनेगर घेतलं तर त्यामध्ये त्याच्या तिप्पट कोमट पाणी टाका. तसेच थोडं व्हाईट व्हिनेगरही तुम्ही यात टाकू शकता. यानंतर हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि ते रोपांवर अधून मधून शिंपडा. यामुळे रोपांवर रोगराई पडणार नाही आणि ती नेहमीच हिरवीगार राहतील. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सट्विंकल खन्नाइनडोअर प्लाण्ट्स