हिवाळ्यात सुरु झाला की घरातील झाडंही बदलेल्या हवामानाचा परिणाम दाखवू लागतात. उन्हाळ्यात हिरवीगार, टवटवीत दिसणारी मनी प्लांटची वेल अचानक पिवळी पडते, पानं गळू लागतात किंवा पूर्णपणे कोमेजलेली दिसते. अनेकजण पाणी कमी-जास्त देणं, ऊन न मिळणं किंवा थंडीचा परिणाम असं कारण देतात.(money plant yellow leaves) खरं तर यामागचं मुख्य कारण म्हणजे तापमानातील बदल. थंडी हा रोपांसाठी ताणाचा काळ असतो आणि योग्य काळजी न घेतल्यास त्यांची वाढ थांबून रोप सुकू लागते.(money plant care in winter)मनी प्लांटच्या रोपाची जास्त प्रमाणात काळजी घ्यावी लागत नाही. पण हिवाळ्यात त्याला योग्य खतांची गरज असते. थंड हवामानात मुळांची वाढ मंदावते आणि मातीतील पोषक घटक शोषले जात नाहीत.(home remedy for money plant) यामुळे पानांचा रंग फिकट होतो, वेलीची वाढ थांबते आणि रोप जिवंत असूनही मरत. अशावेळी कुंडीतल्या मातीत दोन पदार्थ घातल्यास वेलीला पुन्हा बहर येऊ शकतो.
हिवाळा हा ऋतू मनी प्लांटसाठी थोडा कठीण असतो. कमी तापमान, सूर्यप्रकाश आणि पाणी देण्याची झालेली छोटीशी चूक रोपाचे नुकसान करु शकते. यामुळे झाडाची वाढ मंदावते, मुळे कमकुवत होतात आणि पाने पिवळी पडून गळू लागतात. अनेकदा वेल सुकते. अशावेळी आपण मनी प्लांट खराब झाला असं समजून तो फेकून देतो. पण असं करण्याची गरज नाही.
रोपात जीव असेल, पूर्णपणे सुकले नसेल तर थोड्या काळजीने आपल्याला पुन्हा त्याला टवटवीत करता येते.वेळेवर योग्य उपाय करणं देखील महत्त्वाच आहे. हिवाळ्यात मनी प्लांटला पुन्हा जिवंत करण्यासाठी कोणत्याही महागड्या खताची किंवा केमिकलची गरज नसते. यासाठी फक्त दोन गोष्टी पुरेशा आहेत. एक काळी आणि एक पांढरी. काळी गोष्ट म्हणजे लाकडाची किंवा कोळशाची राख आणि पांढरी गोष्ट म्हणजे बेकिंग सोडा. या दोन गोष्टी मिळून रोपाला नवीन ताकद देता येईल.
लाकडाची राख मातीतील आवश्यक पोषक तत्वे वाढवते आणि मुळांना मजबूत करते. तर बेकिंग सोडा मातीतील बुरशी (Fungus) आणि हानिकारक किटाणू नष्ट करण्यास मदत करतो. या मिश्रणामुळे रोपाची मुळे निरोगी होतात आणि नवीन वाढ सुरू होते.
यासाठी आपल्याला सगळ्यात आधी कुंडीतील माती हलकीशी खुरपून त्यात चिमूटभर बारीक लाकडाची राख आणि त्यात चिमूटभर बेकिंग सोडा मिसळा. हे मिश्रण मनी प्लांटच्या मुळाशी घाला. त्यानंतर त्यात पाणी घालण्याऐवजी पाण्याचा हलका स्प्रे करा, ज्यामुळे माती फक्त ओली होईल. ज्यात जास्त पाणी साचणार नाही. आठवड्यातून हा उपाय एकदा केल्यास फायदा होईल. तसेच ४ ते ५ दिवसांत आपल्याला रोपाची वाढ पाहायला मिळेल.
Web Summary : Winter yellows money plants. Revive with wood ash and baking soda in the soil. Lightly spray water. This mix strengthens roots, combats fungus, and boosts growth. Repeat weekly.
Web Summary : सर्दी में मनी प्लांट पीला होता है। लकड़ी की राख और बेकिंग सोडा मिट्टी में मिलाएं। हल्का पानी छिड़कें। यह मिश्रण जड़ों को मजबूत करता है, फंगस से लड़ता है और विकास को बढ़ावा देता है। साप्ताहिक दोहराएं।