कोथिंबीर हा स्वयंपाकघरातील प्रत्येक पदार्थाची चव वाढवतो. अगदी सकाळच्या नाशत्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कोथिंबीराचा वापर केला जातो.(coriander plant care) भाजीत चव येण्यासाठी तसंच सजावटीसाठी कोथिंबीर वापरली जाते. कोथिंबीर खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे देखील आहेत.(winter coriander tips) अनेकदा बाजारातून जास्तीची कोथिंबीर आणली की ती लगेच खराब होते, पाने सुकतात किंवा काळी पडतात.(coriander leaves turning yellow) पण अशावेळी आपण काही सोप्या पद्धतीने कोथिंबीरचे रोप लावल्यास ताजी आणि फ्रेश कोंथिंबीर मिळवू शकता.
हिवाळा सुरु झाला की रोपांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. माती ओलसर राहाते, पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने रोप कोमजते.(coriander plant drying solutions) अशातच अनेक जण रोपाला पाणी कमी - जास्त घालतात. खतं घालतात, रोप हलवतात. पण तरीही कोथिंबीर तग धरत नाही. कारण हिवाळ्यातील थंड माती, मुळांपर्यंत कमी पोषण आणि अनियमित आर्द्रता हीच तिच्या सुकण्याची मोठी कारणं असतात.(kitchen gardening hacks) पण अशावेळी कुंडीत एक पोटली रोवल्यास आठवड्याभरात रोपाची वाढ पुन्हा नव्याने होईल.
कोथिंबीरीचे रोप लावण्यासाठी आपल्याला योग्य बियाची निवड करावी लागेल. जुन्या बियांना अंकुर फुटण्यास जास्त वेळ लागतो. त्यासाठी धणे हलक्या हाताने चोळा, ज्यामुळे त्याचे दोन भाग होतील. तुटणार नाही याची काळजी घ्या. बिया एका भांड्यात ठेवा आणि ६ ते ८ तास पाण्यात भिजवा. बिया भिजवल्याने अंकुर वाढण्यास गती मिळते.
या बिया आता पाण्यातून काढून रुमाल किंवा पातळ सुती कापडात बांधा. ही पोटली कुंडीच्या मातीत रोवा. यासाठी माती ओलसर असायला हवी याची काळजी घ्या. ही पोटली खूप आत किंवा अगदीच वरच्या वर पेरु नका. या पोटलीमुळे बियांना उष्णता आणि ओलावा मिळतो. ज्यामुळे बिया लवकर अंकुरतात. या पोटलीमुळे दोन दिवसांत बियांना अंकुर फुटेल. यानंतर पोटली मातीतून काढा. कुंडीमध्ये बियाणे पसरून पुन्हा हलक्या हाताने माती त्यावर पसरवा. गांडूळ खत किंवा इतर खत घालून पाणी शिंपडा. ७ ते ८ दिवसांत हिरवीगार कोथिंबीर आपल्याला पाहायला मिळेल. रोपाला खूप सूर्यप्रकाशाची गरज लागत नाही. माती नेहमी ओलसर ठेवा, खूप पाणी साचू देऊ नका.
