Join us
Daily Top 2Weekly Top 5

कचरा समजून फेकू नका! भाज्यांच्या साली- देठं मोगऱ्याच्या कुंडीत घाला, 'असं'वापरा खतं- मोगऱ्याच्या फुलांनी बहरेल रोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2026 12:00 IST

mogra plant care: Mogra plant fertilizer: Organic fertilizer for plants: मोगऱ्याच्या कुंडीत कोणते खतं घालायला हवे पाहूया.

फेब्रुवारी महिना सुरु झाला की निसर्गाला पालवी फुटू लागते आणि बहर येतो. अशावेळी आपल्याला मोगऱ्याच्या सुगंधी फुलांचे वेध लागतात.(Organic fertilizer for plants) संध्याकाळी अंगणात दरवळणारा सुगंधी मोगरा मनाला उभारी देतो. पण अनेकांची तक्रार असते की मोगऱ्याच्या रोपाला फुलंच येत नाहीत किंवा झाडाची वाढ खुंटली आहे. (mogra plant care) वातावरणातील बदलाचा आपल्या आरोग्यासह रोपांवरही परिणाम होताना दिसतो. बाल्कनीत किंवा अंगणात असलेले मोगऱ्याचे रोप हळूहळू कोमजू लागतात. पानं गळायला लागतात, वाढ थांबते, माती कोरडी दिसते तर कधी कधी मुळंही सुकल्यासारखी वाटतात. (Mogra plant fertilizer)उन्हाळ्यात भरभर वाढणारं मोगऱ्याचं रोप अचानक निस्तेज होतं, हे आपल्यालाही समजत नाही. त्यामुळे आपण अनेकदा कुंडीत महागडी खते, लिक्विड टॉनिक किंवा वेगवेगळे प्रयोग करतो.(Winter care for mogra plant) पण मातीत नेमके काय घालावे, रोपाला पालवी कशी फुटेल हे आपल्याला समजत नाही. पण आपल्या स्वयंपाकघरातील कचरा समजून फेकून दिल्या जाणाऱ्या भाज्यांच्या साली, देठं हे मोगऱ्याच्या रोपाला पुन्हा बहरण्यास मदत करु शकतात. मोगऱ्याच्या कुंडीत कोणते खतं घालायला हवे पाहूया. 

नवरा दारु पिऊन मारतो, दारुचं दुकान बंद होत नाही म्हणून संतापलेल्या बायकांनी पाहा काय केलं, पोलीस हादरले..

मातीतली बुरशी कमी करण्यासाठी आपण त्यात चमचाभर हळद घालू शकता. ज्यामुळे रोपाला बुरशी किंवा मुंग्या लागणार नाही आणि ते पुन्हा बहरण्यास मदत होईल. सुकलेली पाने देखील रोपासाठी चांगली असतात. यामध्ये नायट्रोजन असते. जे रोपाला नवीन पाने आणि फांद्या तयार करण्यास मदत करतात. फेब्रुवारीमध्ये मुळांच्याभोवती पानांच्या कंपोस्टचा थर लावा. यामुळे मातीचा पोत सुधारतो आणि जास्त काळ ओलावा टिकून ठेवण्यास मदत होते. 

मोगऱ्याला भरपूर फुले येण्यासाठी केळीची साल कुंडीत घाला. यात असणारे फॉस्फरस आणि पोटॅशियम रोपासाठी चांगले असते. केळीची साले फेकून देण्याऐवजी ती उन्हात सुकवा. नंतर मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची पावडर करा. एक किंवा दोन चमचे तयार सालीची पावडर खत म्हणून कुंडीत घाला. 

मोगऱ्याला फुले येण्यासाठी त्याला पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाशाची गरज असते. त्यासाठी रोपाला किमान ५ ते ६ तास सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी ठेवा. कुंडीत खतं घातल्यानंतर त्याला थोडे थोडे पाणी घाला. फेब्रुवारी महिन्यात माती कडक होऊ लागते अशावेळी पाणी घालणं महत्त्वाचं असते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Don't waste vegetable scraps! Use them as Mogra plant fertilizer.

Web Summary : Rejuvenate Mogra plants with kitchen scraps like vegetable peels! Turmeric prevents fungus, dried leaves add nitrogen. Banana peels provide potassium. Ensure sunlight and water for abundant blooms.