गुलाबाची फुलं ही कायम त्यांच्या सौंदर्य आणि सुगंधासाठी ओळखली जातात. लाल, पिवळी, गुलाबी किंवा पांढरी फुलं आपल्या घराच्या बाल्कनीत असली की घरही सुंदर दिसू लागत.(Banana peel for rose plants) फुलांचे सौंदर्य हे आपल्या घराची शोभा वाढवतात. पावसाळा सुरु झाला की, रोपांना पुरेशा प्रमाणात ऊन मिळत नाही.(Home fertilizer for roses) ज्यामुळे ते कोमजतात, त्यांना कळ्यासुद्धा उमलत नाही. पावसाळ्यात गुलाबाच्या रोपासह इतर रोपांना देखील फुले फुलावीत असं वाटतं असेल तर कचरा समजून फेकून देणाऱ्या केळीच्या सालीचा अशा पद्धतीने वापर करा. (Gardening tips for rose care)
मनी प्लांटची पानं पिवळी पडली, वेलीची वाढ खुंटली? मातीत मिसळा पांढरा पदार्थ, वेल वाढेल भराभर
अनेकदा केळी खाल्ल्यानंतर आपण त्याची सालं कचरा समजून फेकून देतो. पम साल ही वनस्पतींसाठी वरदनापेक्षा कमी नाही. केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फरसारखे अनेक पोषक तत्व यात आढळतात. हे वनस्पतींच्या मुळांना मजबूत करण्यास मदत करतात. ज्यामुळे त्यांची वाढ लवकर होण्यास सुरुवात होते. हे एक नैसर्गिक, स्वस्त आणि रसायनमुक्त खत आहे जे फुलांच्या आणि फळांच्या वनस्पतीसाठी चांगले मानले जाते.
केळीच्या सालीचा उपयोग कसा करावा?
केळीची साल वापरण्यासाठी आपण त्याचे लहान तुकडे करुन थेट मातीत घाला. यामुळे साल हळूहळू कुजू लागेल आणि मातीत पोषक तत्व सोडली जातात, ज्यामुळे झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचतात. दुसरी पद्धत म्हणजे द्रव खत तयार करणं. यासाठी केळीची साले २ ते ३ दिवस पाण्यात भिजवा. रोपांच्या गरजेनुसार या पाण्यात पोटॅशियम आणि फॉस्फरस विरघळतात. नंतर हे पाणी झाडांच्या मुळांजवळ ओता,यामुळे रोपांना पुरेशा प्रमाणात खत मिळेल
कोणत्या वनस्पतीसाठी केळीची साल फायदेशीर?
गुलाब, मनी प्लांट, टोमॅटो, मिरची आणि वांगी यांसारख्या वनस्पतींसाठी केळीच्या साली प्रभावी आहेत. पोटॅशियम रोपांना वाढवण्यासाठी आणि फळे येण्याच्या प्रक्रियेत अधिक मदत करतात. याचा पावडर बनवून आपण खत देखील तयार करु शकतो. उन्हात केळीच्या साली वाळवून मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करा. पावडर मातीत मिसळा. असं केल्याने गुलाबाच्या रोपाला टपोरी फुले फुलण्यास मदत होईल.