Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात मोगऱ्याच्या रोपाला वाढ नाही, मुळेही सुकली? कुंडीत घाला ५ रुपयांची गोष्ट, आठवडाभरात रोपाला फुटेल पालवी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2025 14:45 IST

Jasmine plant winter care: Copper sulphate for plants: Jasmine plant growth tips: Winter care for jasmine plant: आपण कुंडीत ५ रुपयांचा हा पदार्थ घातला तर रोपाला नव्याने पालवी फुटायला मदत होईल.

हिवाळा सुरु झाला की वातावरणात गारवा दिसू लागतो. याचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या आरोग्यासह रोपांवर होताना दिसतो.(mogra plant winter care) बाल्कनीत किंवा अंगणात असलेली रोप हळूहळू कोमेजतात. मोगऱ्याचं, गुलाबाचं रोप घरात असलं की अनेकांना प्रश्न पडतो.(Copper sulphate for plants) पानं गळायला लागतात, वाढ थांबते, माती कोरडी दिसते आणि कधी कधी मुळंही सुकल्यासारखी वाटतात. (Jasmine plant growth tips)उन्हाळ्यात भरभर वाढणारं मोगऱ्याचं रोप हिवाळ्यात अचानक निस्तेज का होतं, हे आपल्यालाही समजत नाही. त्यामुळे आपण अनेकदा कुंडीत महागडी खते, लिक्विड टॉनिक किंवा वेगवेगळे प्रयोग करतो.(Winter care for mogra plant) पण मातीत नेमके काय घालावे, रोपाला पालवी कशी फुटेल हे आपल्याला समजत नाही. जर आपण कुंडीत ५ रुपयांचा हा पदार्थ घातला तर रोपाला नव्याने पालवी फुटायला मदत होईल. 

टपरीवर मिळतो तसा फक्कड मसाला चहा करा घरीच, पंकज त्रिपाठींनी शेअर केली खास ट्रिक, चहा होईल घट्ट

खरंतर रोपाला बुरशी ही एका दिवसात लागत नाही. आपण कुंडीत जास्त पाणी घातले तर मुळे कुजतात आणि मातीत बुरशी वाढते. आणि दुसरे म्हणजे अनेकदा पूर्णपणे कुजलेल्या वनस्पतींमध्ये आपण कंपोस्ट घालतो. कच्चे कंपोस्ट वाळवी आणि बुरशी रोपांमध्ये वाढवते. जे झाडाला आतून खराब करते. 

आपण मातीतमध्ये ब्लू स्टफ अर्थात कॉपर सल्फेट घालायला हवे. हा निळ्या रंगाचा पदार्थ मातीतील बुरशी कमी करतो. जर आपल्याला रोपामध्ये बुरशी लागली असेल तर चमचाभर हळद देखील घालू शकता. झाड खूपचे कोमजले असेल तर ब्लू व्हिट्रिओल घाला. 

हे ब्लू व्हिट्रिओल रासायनिक संयुग आहे. आपण अंदाजे ५ ग्रॅम ब्लू व्हिट्रिओल घ्या आणि ते १ लिटर पाण्यात विरघळवा. १२ तास हे पाण्यात विरघळू द्या. घरगुती वापरासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा काचेचा कंटेनरमध्ये हे घाला. यासाठी लोखंडी किंवा स्टीलचे कंटेनर वापरणे टाळा. 

रोपाला नव्याने पालवी फुटण्यासाठी द्रावण योग्य प्रमाणात मातीत घाला. रोप मोठे असेल तर संपूर्ण पाणी त्यात घाला. आणि लहान झाडांसाठी प्रति लिटर पाण्यात फक्त २ ग्रॅम घाला. तसेच हे पाणी घालण्यापूर्वी कुंडीतील माती कोरडी आहे की नाही याची देखील काळजी घ्या. हा उपाय करुन पाहिल्याने १५ दिवसात रोपाला नव्याने पालवी फुटेल. तसेच फांद्यांना नवीन जीव येईल. मातीत खूप जास्त बुरशी असेल तर १५ दिवसांनी पुन्हा हा उपाय करुन पाहावा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Revive Mogra in Winter: Copper Sulfate for Lush Growth!

Web Summary : Mogra plants often struggle in winter. Revive them by adding copper sulfate (blue vitriol) to the soil. This combats fungus and encourages new growth. Dissolve 5 grams in water, apply to dry soil, and see results in weeks.
टॅग्स :बागकाम टिप्स