हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानलं जातं. तिची रोज नित्यनियमाने पूजा-अर्चना देखील केली जाते. पण ऋतू बदलला की तुळशीच्या रोपावर त्याचा परिणाम होतो.(Tulsi plant care) अचानक बहरलेली तुळस कोमजते, सुकते किंवा पानं काळी पडून गळतात. रोज पाणी घालूनही पाने जळाल्यासारखी दिसतात, देठ काळवंडतो आणि काही दिवसांत फक्त काड्याच उरतात.(Dried tulsi plant) अशावेळी आपण तुळस जळाली किंवा मेली असं समजून कुंडी बाजूला ठेवतो. पण खरं त्या सुकलेल्या तुळशीला आपल्याला पुन्हा नव्याने बहर आणता येऊ शकतो.
तुळशीच्या रोपाला चुकीच्या वेळी पाणी देणं, वाढलेली उष्णता, मातीतील पोषणाची कमतरता किंवा सतत केमिकल खतांचा वापर यामुळे ती कमकुवत होते.(Homemade fertilizer for plants) योग्य वेळी नैसर्गिक खत दिलं तर कोमजलेली तुळस पुन्हा हिरवीगार होऊ शकते. कोणताही खर्च न करता, केमिकल्स न वापरता आपण तुळशीत काही घरगुती खते वापरुन तिला नवीन जीवदान देऊ शकतो. पाहूया मातीत कोणती खतं घालायला हवी.
1. तुळस ही उष्ण हवामानातील वनस्पती आहे. तिला वाढवण्यासाठी भरपूर प्रकाशाची आवश्यकता असते. रोपाला किमान आठ तास पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या. सावलीमुळे तुळशीची पाने पिवळी किंवा काळी होतात. पाने गळतात ज्यामुळे रोप कमकुवत होते. त्यासाठी तुळशीच्या रोपाला सूर्यप्रकाशात ठेवा.
2. तुळशीच्या रोपाला भरपूर पाणी देऊ नका. जास्त पाणी दिल्याने मुळांमध्ये बुरशी वाढते, ज्यामुळे झाड मरते. मातीत चिखल होणार नाही याची काळजी घ्या. तुळशीच्या रोपाला रोज पाणी घालू नका. जर घालणार असाल तर थोडेसे घाला.
3. रोपाला बहर येण्यासाठी पाने भरगच्च वाढल्यानंतर ती काढून टाका. यामुळे नवीन फांद्या येतात. तुळशीच्या रोपाला कळ्या दिसू लागल्या की त्या काढा. ज्यामुळे तुळशीला बहर येतो.
4. तुळशीचे रोप लावण्याची वेळही महत्त्वाची असते. अति उष्णतेत किंवा थंडीत तुळशीचे रोप लावू नका. पावसाळा किंवा फेब्रुवारी हा महिना तुळशीच्या रोपासाठी चांगला असतो. बुरशी टाळण्यासाठी तुळशीची पिवळी पाने सतत काढत राहा.
5. महिन्यातून एकदा कुंडीत चहा पावडर घाला. एक लिटर पाण्यात कुटलेली मोहरी मिसळून हे पाणी २४ तास राहू द्या. हे जादुई खत दुसऱ्या दिवशी कुंडीत घाला. रोपाला बुरशी किंवा मुंग्या लागत असतील तर मातीत चमचाभर हळद घाला.
