आपल्यापैकी अनेकांच्या घरात इनडोअर प्लांट्स पाहायला मिळतात. (Plant care) शहरातील अनेक भागात झाडे लावता येत नाही.(gardening tips) त्यामुळे बाल्कनीत किंवा टेरेसवर रोप लावतात. पण काही रोप ही बाल्कनीत नाही तर घरात ठेवण्याची इच्छा अनेकांना असते.(How to make indoor plants green) त्यासाठी विकत इनडोअर प्लांट्स आणतात. इनडोअर प्लांट्स हे घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात असं म्हटलं जातं. घराची शोभा वाढवण्यासाठी या रोपाची मदत अधिक होते.(Indoor plant care tips) पण बरेचदा इनडोअर प्लांट सुकते. याची अनेक कारणे असू शकतात. (Home remedy for plant growth)
रोपाला अधिक प्रमाणात पाणी दिले, सूर्यप्रकाशाची कमतरता, पुरेशा प्रमाणात रोपाला हवा न मिळणे, कीटक किंवा बुरशी लागणे आणि पोषणाचा अभाव असेल तर झाड सुकते किंवा कोमजते.(Organic fertilizer for indoor plants) रोपाच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात पाणी, सूर्यप्रकाश आणि सेंद्रिय खत महत्त्वाचे आहे. झाडं सुकू लागले की त्यांची मुळे, माती आणि पानं आपण पाहायला हवी.
मनी प्लांटची पानं पिवळी पडली, वेलीची वाढ खुंटली? मातीत मिसळा पांढरा पदार्थ, वेल वाढेल भराभर
इनडोअर प्लांटला वाढवण्यासाठी आपण मातीमध्ये तांदळाचे पाणी घालायला हवे. हे पाणी मातीत खत म्हणून काम करते. तांदूळ धुवून त्याचे पाणी फेकण्याऐवजी ते झाडांसाठी साठवून ठेवा. झाडांना तांदळाचे पाणी घालण्याचे फायदे आणि वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.
झाडांना आणि मातीला तांदळाचे पाणी घातल्याने ते लवकर वाढण्यास मदत होते. तसेच ते निरोगी राहतात. तांदळाच्या पाण्यात फॉस्फरस, पोटॅशियम, नायट्रोजन असे प्रकारचे पोषक घटक असतात, ज्यामुळे एक नैसर्गिक खत तयार होते. यात असणारे काही घटक मातीत मिसळल्यावर झाडांची मुळे निरोगी आणि मजबूत होतात. यामुळे झाड वाढण्यास मदत होते.
झाड वाढलं पण लिंबाचा पत्ता नाही? १० रुपयांची गोष्ट मातीत घाला, येतील पिवळेधम्मक लिंबू
मातीत तांदळाचे पाणी घातल्यानंतर वनस्पतींसाठी फायदेशीर सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. ज्यामुळे मातीची गुणवता आणि सुपीकता सुधारते. भाताचे पाणी झाडांवर फवारल्याने कीटक आणि मुंग्या दूर राहतात. तांदूळ धुतल्यानंतर ते पाणी फेकण्याऐवजी भांड्यात साठवा. हे पाणी बाटलीत भरुन ठेवा किंवा अंधारा असलेल्या ठिकाणी ठेवा यामुळे ते लगेच आंबेल. यातील पोषक तत्वे वाढतील. हे पाणी मातीत घाला आणि झाडावर फवारणी करा. आठवड्यातून एकदाच हे पाणी घाला. तांदूळ उकळून शिजवतात, तेव्हा ते पाणी थंड केल्यानंतर त्यातील स्टार्च देखील घालून शकता.