उन्हाळा सुरू झाला की अनेक रोपांची पानगळती सुरू होते. त्यामुळे मग त्यांची पानं पिवळी पडतात, सुकतात आणि एखाद्या दिवशी अलगदपणे गळून पडतात. कुंडीतल्या मातीमध्ये रोपांची गळून गेलेली पाने बऱ्याच प्रमाणात जमा होऊ लागतात. ज्यांच्या अंगणात बरीच झाडं आहेत त्यांच्याकडे तर असा सुकलेला पालापाचोळा खूप निघतो. बहुतांश घरांमध्ये हा पाचोळा झाडला जातो आणि थेट कचराकुंडीमध्ये टाकला जातो. तुम्हीही तसंच करत असाल तर थोडं थांबा (How To Make Best Fertilizer For Plants Using Dry Leaves?). कारण हा पालापाचोळा काही रोपांसाठी अतिशय उत्तम दर्जाचं खत ठरू शकतो. त्यासाठी काय करायचं आणि घरच्याघरी खत कसं तयार करायचं ते पाहूया...(home made fertilizer for fast plant glowth)
रोपांच्या सुकलेल्या पानांपासून खत कसं तयार करायचं?
रोपांसाठी पालापाचोळ्यापासून उत्तम दर्जाचं खत घरच्याघरी कसं तयार करायचं याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ anokha_aangan या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
शरीरात होणारे 'हे' बदल कॅन्सरची लक्षणं असू शकतात! दुखणं अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांना दाखवा
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की सुकलेला जो पालापाचोळा असेल तो एखाद्या कुंडीमध्ये किंवा भांड्यामध्ये जमा करा आणि हातानेच थोडा क्रश करून घ्या.
यानंतर त्यामध्ये माती टाकून ठेवा. माती टाकल्यानंतर माती आणि पाचोळा हलवून पुन्हा व्यवस्थित एकत्र करून घ्या.
आता हे जे सॉईल मिक्स तयार झालेलं असेल ते तुम्ही एखादं रोप लावण्यासाठी वापरू शकता. पालापाचोळ्यामुळे माती सच्छिद्र होते आणि अधिक चांगल्या प्रकारे पाणी धरून ठेवते. याशिवाय पालापाचोळ्यांमधून रोपांच्या वाढीसाठी उत्तम ठरणारे अनेक घटक मातीमध्ये मिसळले जातात आणि त्यामुळे रोपं जोमाने वाढतात.
पाहुण्यांसाठी करा कांदा- बीट लाेणचं! सॅलेड म्हणून खायलाही मस्त- घ्या एकदम सोपी रेसिपी
जर एखादे रोप लावण्यासाठी या मातीचा वापर करायचा नसेल तर दर २ ते ३ महिन्यांनी ही माती थोडी थोडी करून प्रत्येक कुंडीमध्ये टाकून द्या.. यामुळेही रोपांना छान पोषण मिळून त्यांची चांगली वाढ होईल.