हिवाळा आला की आपल्या बागेतील अनेक हिरवीगार रोपे मरगळायला लागतात.(Tulsi care winter) या काळात अनेकदा तुळस सुकते, तिची पाने गळतात किंवा तुळशीच्या रोपाच्या पानांचे प्रमाण कमी होऊन फक्त काड्याच जास्त दिसतात.(Basil plant care tips) झाडांची योग्य काळजी घेतली नाही तर ते कोमजतात किंवा त्यांची पाने देखील सुकतात.(Tulsi plant problems) हिवाळ्यात तुळशीच्या झाडाची पाने देखील पिवळी पडतात. कधीकधी तर संपूर्ण झाडही सुकून जाते. (Winter gardening tips India)
जर आपल्या बागेतील तुळशीचे रोप हिवाळ्यातही हिरवेगार-बहरलेलं आणि ताजंतवानं ठेवू शकता. त्याची पाने औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत.(How to keep tulsi green) जर आपली तुळस सुकत असेल, पाने पिवळी पडत असतील तर कुंडीत मिसळा ही खास गोष्ट. तसेच काही खास सिक्रेट उपाय देखील करता येतील.(Organic fertilizer for tulsi)
हिवाळ्यात तुळशीचे रोप उन्हात ठेवावे लागेल. सूर्यप्रकाश आणि पाणी मिळाले नाही तर रोप कोमजते. तुळशीच्या झाडाला जास्त पाणी देणे टाळा. तसेच थंड वारा आणि दव यापासून तुळशीचे रक्षण करायला हवे. तुळशीचे झाड जास्त प्रमाणात थंडी सहन करु शकत नाही. जेव्हा तुळशीला जास्त प्रमाणात मंजिरी येतात तेव्हा त्या काढून कुंडीत पुन्हा घाला. जास्त मंजिरीमुळे तुळशीचे रोप सुकते.
तुळशीच्या रोपासाठी माती तयार करताना आपल्याला १ कप पाण्यात १ चमचा कॉफी पावडर आणि १/२ चमचा मीठ मिसळा. हे दोन्ही घटक मिसळल्याने द्रव खत तयार होईल. यानंतर तुळशीच्या रोपामधील थोडी माती खणून चमच्याच्या मदतीने तयार खत मातीत घाला. नंतर थोडेसे पाणी तुळशीच्या रोपात घाला. यामुळे मातीला पुरेसा ओलावा मिळेल आणि झाडाला पुरेशा प्रमाणात पोषण देखील मिळेल.
आपल्या घराच्या बाल्कनीत तुळशीचे रोप लावायचे असेल तर ते सहजपणे लावता येईल. त्यासाठी मध्यम आकाराची कुंडी घेऊन त्यात शेण मिसळलेली माती भरा. तुळशीच्या झाडाचे मुळ जमिनीत ५ इंचापर्यंत गाडा. त्याला थोडेसे पाणी घाला. काही दिवसात तुळशीचे रोप वाढू लागेल.
