हिवाळा आला की आपल्याला बाजारात सर्वत्र पाहायला मिळतो तो हिरवागार मटार.(Grow peas at home) या काळात मटारपासून आपण विविध पदार्थ खातो.(Sprouted peas planting) प्रत्येक भाजी किंवा इतर पदार्थांमध्ये मटारचा समावेश केला जातो.(Winter gardening tips) पण आजकाल रसायनं, पॉलिशिंग आणि कोल्ड स्टोरेजमुळे बाजारात मिळणारा ताजा, गोड आणि पौष्टिक मटारची चव चाखता येत नाही. या ऋतूमध्ये मटारचा भाव देखील वाढतो. अगदी १०० रुपये किलोंपासून मटारचे दर बाजारात पाहायला मिळतात. पण वर्षभर मटार खायचे असतील तर ताजे हिरवेगार मटार आपण घरच्या घरी खाऊ शकतो. (Kitchen gardening tips) बाजारातून मटार खरेदी करण्यापेक्षा घराच्या छोट्याशा बाल्कनीत आपण हिरवागार मटार उगवू शकतो. यासाठी काही सोप्या पद्धती आपल्याला लक्षात ठेवायला हव्या.
डाळ-तांदूळ न भिजवता, न आंबवता; १५ मिनिटांत करा काकडी इडली, कापसाहून मऊ आणि हलकी- पाहा रेसिपी
मटारच्या बिया कुंडीत लावण्याऐवजी त्याला अंकुर फुटणे महत्त्वाचे आहे. आपल्याकडे सुकलेले मटार असतील तर त्याला २४ तास पाण्यात भिजवा. त्यानंतर भिजवलेले किंवा ताजा मटार टॉवेल किंवा रुमालात घट्ट गुंडाळा. हवाबंद डब्यात रुमाल ४ दिवस ठेवा. ओलावा आणि हवेमुळे मटारला कोंब फुटेल. यानंतर जमिनीत लावल्यास रोप येईल.
मटारचे रोप लावताना आपल्याला चांगली मातीची गरज लागेल. त्यासाठी ५० टक्के बागेची माती, ३० टक्के गांडूळखत आणि शेणखत एकत्र करा. त्यात २० टक्के वाळू घाला. यामुळे माती हलकी होऊन त्यात पाणी साचणार नाही. यावेळी आपण मातीत कडुलिंबाची पेंड सुद्धा घालायला हवी. ज्यामुळे बुरशी आणि कीटकांपासून मातीचे संरक्षण होईल.
मटारची वेल फार खोलवर जात नाही. त्यासाठी आपल्या रुंद किंवा लांब कुंडी घ्यावी लागेल. यामुळे वेल बहरण्यास योग्य जागा मिळते. कुंडीत समान पद्धतीने माती पसरवा. त्यानंतर बोटाच्या मदतीने मातीत छोटे होल करा. प्रत्येक होलमध्ये कोंब आलेले मटार घाला. वरुन हलकी माती पसरवून छिद्र बंद करा. त्यानंतर एकाच वेळी सर्व बियाण्यांवर पाणी शिंपडा. खूप पाणी घालू नका.
महिन्याभरात रोप यायला सुरुवात होईल. रोप यायला सुरुवात झाली की वेलीला आधार म्हणून लाकूड ठेवा. ज्यामुळे वेल व्यवस्थित बहरेल. वेलीला पुरेशा सूर्यप्रकाश मिळेल याची देखील काळजी घ्या. २८ ते ३० दिवसांत वेलीला फुले येतील. त्यानंतर ६० ते ६५ दिवसांमध्ये वेलीला मटार यायला सुरुवात होईल. वेलीची योग्य काळजी, पुरेसे खत आणि सूर्यप्रकाश मिळाला तर ते नक्कीच बहरण्यास मदत होईल.
Web Summary : Grow peas at home for fresh, chemical-free produce. Sprout peas before planting in a soil mix of garden soil, compost, and sand. Use a wide pot and provide support as the vine grows. Expect peas in about 60-65 days.
Web Summary : ताज़ी, रसायन-मुक्त उपज के लिए घर पर मटर उगाएँ। बगीचे की मिट्टी, खाद और रेत के मिश्रण में लगाने से पहले मटर को अंकुरित करें। एक चौड़ा बर्तन का उपयोग करें और बेल के बढ़ने पर सहारा दें। लगभग 60-65 दिनों में मटर की उम्मीद करें।