Join us

झाड वाढलं पण लिंबाचा पत्ता नाही? १० रुपयांची गोष्ट मातीत घाला, येतील पिवळेधम्मक लिंबू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2025 18:05 IST

lemon plant care tips : natural fertilizer for lemon plant: lemon tree home gardening : आपल्यालाही दारातील लिंबाच्या झाडाला भरपूर लिंबू लागावे असं वाटत असेल तर मातीमध्ये हे खत घालायला विसरु नका.

आपल्यापैकी अनेकांच्या घरासमोर किंवा बाल्कनीत स्वतंत्र अशी शेती पाहायला मिळते.(Gardening tips) घराच्या अंगणात आपण आपल्या आवडीचे फुलझाड किंवा फळझाडे लावतो.(Lemon plant care) त्या झाडांपैकी एक लिंबाच झाड. लिंबाच्या झाडाची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही किंवा त्याला योग्यप्रकारे पोषण मिळाले नाही तर ते सुकते किंवा कोमजून जाते. (natural fertilizer for lemon plant) अनेक लोक लिंबाच झाड लावून त्याला रोज पाणी घालतात. पण पुरेशा प्रमाणात खत दिले नाही तर झाडं मोठ होऊनही त्याला फळ येत नाही.(how to get lemons on tree) लिंबाच्या झाडासाठी माती आणि खताची योग्य निवड करणं गरजेचे आहे.(organic tips for lemon growth) जर आपल्यालाही दारातील लिंबाच्या झाडाला भरपूर लिंबू लागावे असं वाटत असेल तर मातीमध्ये हे खत घालायला विसरु नका. 

मोगरा.. फुललाच नाही कोमेजून गेला पावसात? ‘हे’ खास टॉनिक द्या, मोगरा आनंदाने फुलेल जोमाने

लिंबाच्या झाडासाठी काय आवश्यक?

1. मूठभर पोटॅश, एप्सम मीठ, शेणखत आणि लाकडाची राख या सगळ्या गोष्टी मातीत घाला. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी कुंडीभोवती किंवा जमिनीभोवतीची माती पूर्णपणे खोदून काढावी लागेल. यावेळी मातीतील तण काढायला विसरु नका. ३ ते ४ इंच खोल खोदून काढा, मुळे खराब होणार नाही याची काळजी घ्या. माती खोदल्यामुळे मुळांपर्यंत हवा पोहोचते तसेच पोषक तत्व देखील मिळते. 

2. माती खुरपून काढल्यानंतर त्यात मूठभर पोटॅश घाला. हे झाडाला वाढवण्यासाठी आणि फळे येण्यासाठी अधिक महत्त्वाचे असते. यामुळे झाडाला पुरेशा प्रमाणात पोटॅशियम मिळते. इतकेच नाही तर झाडाला नव्याने फुलण्यास मदत करते. 

गुलाबाच्या रोपाला कळ्या लागतात पण उमलत नाही, गळून जातात? ४ टिप्स- गुलाबाच्या फुलांनी वाकेल झाड

3. एप्सम मीठ हे झाडासाठी चांगले मानले जाते. एक लिटर पाण्यात चमचाभर मीठ घाला. या द्रावणाच्या मदतीने झाडाच्या पानांवर फवारणी करा. काही प्रमाणात मातीत घाला. यामुळे झाडाला पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम मिळते. तसेच पाने हिरवीगार आणि निरोगी राहतात. 

4. झाडाभोवती २ ते ३ मूठभर शेणखत घाला. यामुळे झाडाला पोषण तर मिळतेच आणि जमिनीची सुपीकता देखील वाढते. लाकडाची राख ही खतांसाठी पोटॅशियमचा नैसर्गिक स्त्रोत आहे. तसेच झाडाला पुरेसे पाणी, खत आणि सूर्यप्रकाश मिळणं देखील गरजेचं आहे.  

टॅग्स :बागकाम टिप्स