Join us  

How To Grow Lemon Plant: कुंडीतल्या झाडालाही येतात रसरशीत लिंबू! तज्ज्ञांचा सल्ला, करा फक्त ५ गोष्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2022 7:12 PM

Gardening Tips: छोटंसं टेरेस गार्डन किंवा लहान बाल्कनी असली तरीही त्यात लिंबाचं इवलंसं झाड (lemon plant) येऊ शकतं आणि तुम्हाला भरभरून लिंबूही देऊ शकतं.. बघा त्यासाठी काय करायचं ते..

ठळक मुद्देलिंबाचे भाव कमी होतात की वाढतात, याची चिंता करण्यापेक्षा तुमच्या अंगणातच लावून टाका की एक छानसं छोटंसं लिंबाचं झाड..

लिंबाचे भाव वाढले आणि प्रत्येकाला आपल्या दारी लिंबाचे झाड हवे होते, असे वाटू लागले. ऐन उन्हाळ्यात लिंबाचे भाव कडाडल्याने चांगलीच पंचाईत झाली आहे. स्वत:ची, घरच्यांची आणि पाहुण्यांची तहान भागवायला आता लिंबू- सरबत ऐवजी दुसरे पर्याय शोधावे लागत आहेत. सर्वसामान्यांनी तर मागच्या कित्येक दिवसांत घरी लिंबू आणलेलंच नाही. त्यामुळेच तर ज्यांच्या घरी लिंबाचं झाड आहे, त्यांचा अशावेळी फार फार हेवा वाटतो. (How to grow lemon plant in your small terrace garden)

 

म्हणूनच तर लिंबाचे भाव कमी होतात की वाढतात, याची चिंता करण्यापेक्षा तुमच्या अंगणातच लावून टाका की एक छानसं छोटंसं लिंबाचं झाड.. लिंबाचं झाड लावण्यासाठी खूप मोठी जागा तुमच्याकडे असावी, असं मुळीच नाही. मध्यम आकाराच्या कुंडीतही अगदी उत्तम झाड येऊ शकतं आणि कुटूंबाची गरज भागेल एवढे लिंबूही त्यापासून सहज मिळू शकतात. लिंबाचं झाड कसं लावायचं, त्याची काळजी कशी घ्यायची वनस्पती अभ्यासक अंजना देवस्थळे यांनी दिलेली ही विशेष माहिती..

 

लिंबाचं झाड लावताना काय काळजी घ्यावी?how to take care of lemon plant?१. कुंडीत जर लिंबाचं झाड लावणार असाल तर त्यासाठीची कुंडी ही कमीतकमी १२ इंच पाहिजे.२. लिंबाच्या झाडाला मुळाशी खूप पाणी नको असतं. त्यामुळे कुंडीत माती भरण्यापुर्वी त्यात थोडे विटांचे तुकडे, छोटे दगड टाका आणि नंतर माती, खत भरा.३. लिंबाचं झाड जोपर्यंत परिपक्व होणार नाही, तोपर्यंत त्याला फळं येणार नाही. त्यामुळे बियांपासून झाड लावणार असाल तर फळ लागण्यासाठी थोडी वाट पहायला पाहिजे.४. सरबती लिंबू ही लिंबाच्या झाडाची जाती भरभरून लिंबं देते. त्यामुळे घरी लावण्यासाठी शक्यतो याच जातीचं रोपटं आणा.

५. लिंबाच्या झाडाला भरपूर ऊन लागतं. त्यामुळे जिथे चांगलं ऊन येईल, तिथेच हे झाड ठेवा.६. उन्हाळ्यातही तुम्ही लिंबाचं रोपटं लावू शकता.७. लिंबाचं रोप लावल्यानंतर महिन्यातून एकदा माती खाली- वर करणे, त्याला कंपोस्ट खत देणे गरजेचे असते.८. लिंबू येईपर्यंत त्याच्या पानांचा उपयोग करा. कारण ती देखील अतिशय आरोग्यदायी असतात. ब्लॅक टी घेत असल्यास त्यात लिंबाची पानं टाका. चहाचा कडवटपणा कमी होतो. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सगच्चीतली बागइनडोअर प्लाण्ट्सपाणी