Lokmat Sakhi >Gardening > २ गोष्टी करा कुंडीतल्या जास्वंदीच्या रोपाला येतील भरपूर फुले, वाळवी ही लागणार नाही

२ गोष्टी करा कुंडीतल्या जास्वंदीच्या रोपाला येतील भरपूर फुले, वाळवी ही लागणार नाही

How to grow hibiscus plant: Hibiscus plant care tips: जास्वंदीच्या रोपाला फुलांचा बहर येण्यासाठी घरगुती टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2025 12:12 IST2025-05-08T12:11:28+5:302025-05-08T12:12:21+5:30

How to grow hibiscus plant: Hibiscus plant care tips: जास्वंदीच्या रोपाला फुलांचा बहर येण्यासाठी घरगुती टिप्स

Gardening tips how to grow hibiscus plant add lemon peel and tea powder in soil flower blossom | २ गोष्टी करा कुंडीतल्या जास्वंदीच्या रोपाला येतील भरपूर फुले, वाळवी ही लागणार नाही

२ गोष्टी करा कुंडीतल्या जास्वंदीच्या रोपाला येतील भरपूर फुले, वाळवी ही लागणार नाही

आपल्या अंगणात किंवा बाल्कनीत जास्वंदीचे रोप हमखास असते. जास्वंदीची लाल, पिवळी, पांढरी अशी रंगीबेरंगी फुले आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात.(How to grow hibiscus plant) या रोपाची जास्त प्रमाणात काळजी घ्यावी लागत नाही.(Hibiscus plant care tips) परंतु, उन्हाळ्यात याची पाने पिवळी पडतात किंवा झाडाला बुरशी-वाळवी लागते. पानांना छोटी छिद्र पडतात. यामुळे झाड हळूहळू कोमेजू लागते. (Hibiscus flower blooming tips)

जास्वंदीच्या झाडाला भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश मिळाला की, ते स्वत:च बहरु लागते. अनेकदा झाडाला कीड लागल्यामुळे ते नीटसे बहरत नाही. त्यासाठी आम्ही तुम्हाला सोपा उपाय सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने झाडाला कीड ही लागणार नाही आणि ते व्यवस्थित बहरेल देखील. हे खत आपण घरच्या घरी तयार करु शकतो. त्यातील पोषक घटक रोपाला वाढण्यास मदत करतात. जाणून घेऊया खत कसे तयार करायचे. 

रोज कुंडीतल्या रोपांना ‘या’वेळी घाला पाणी, रोपं राहतील हिरवीगार-उन्हाळ्यात सुकणार नाहीत

जास्वंदीच्या रोपात घाला हे पदार्थ 

जास्वंदीच्या रोपात घालण्यासाठी आपण लिंबाच्या साली आणि चहा पावडरचा वापर करु शकतो. लिंबाच्या सालीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि फास्फरस सारखे पोषक तत्व असतात. जे झाडाच्या वाढीसाठी मदत करतात. यामुळे झाडाला कीड लागत नाही. तसेच त्याच्या सुगंधामुळे कीटक देखील दूर राहतात. चहा पावडरमध्ये नायट्रोजन असते. जे फुलांच्या वाढीसाठी चांगले असते. चहा पावडर मातीची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. 

उन्हाळ्यात कुंडीतील रोपं सुकतात-कोमजतात? मातीत घाला 'ही' घरगुती खतं, रोपांना येईल नव्याने बहर...

कसा कराल उपयोग? 

जास्वंदीच्या रोपात लिंबाची साल आणि चहा पावडर टाकण्यासाठी आपल्याला एक लिटर पाण्यात ४ ते ५ लिंबाची सालं आणि १ चमचा चहा पावडर घालून १२ तास तसेच राहू द्या. नंतर हे पाणी गाळून जास्वंदीच्या रोपाला घाला. असे केल्याने रोपाला चांगले खत मिळेल. ज्यामुळे लालजर्द फुले येण्यास मदत होईल. 

 

Web Title: Gardening tips how to grow hibiscus plant add lemon peel and tea powder in soil flower blossom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.