Lokmat Sakhi >Gardening > कारल्याची वेल सुकली- पानेही पिवळी पडली? ४ गोष्टी लगेच करा- वेलीला येईल कारल्याचा बहर...

कारल्याची वेल सुकली- पानेही पिवळी पडली? ४ गोष्टी लगेच करा- वेलीला येईल कारल्याचा बहर...

How to grow bitter gourd: Bitter gourd yellow leaves solution: Bitter gourd growing tips: अनेकदा रोपाची वाढ होत नाही, फुले-फळे येत नाही यावेळी ४ गोष्टी लगेच करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2025 13:25 IST2025-05-15T13:24:16+5:302025-05-15T13:25:24+5:30

How to grow bitter gourd: Bitter gourd yellow leaves solution: Bitter gourd growing tips: अनेकदा रोपाची वाढ होत नाही, फुले-फळे येत नाही यावेळी ४ गोष्टी लगेच करा.

gardening tips how to grow bitter ground plants leaves turning in yellow 4 simple ingredients add in soil leaves will blossom | कारल्याची वेल सुकली- पानेही पिवळी पडली? ४ गोष्टी लगेच करा- वेलीला येईल कारल्याचा बहर...

कारल्याची वेल सुकली- पानेही पिवळी पडली? ४ गोष्टी लगेच करा- वेलीला येईल कारल्याचा बहर...

उन्हाळा सुरू झाला की आपल्यापैकी अनेकांना रोपांची लागवड करण्याची हौस असते.(How to grow bitter gourd) हल्ली शहरात पुरेशी जागा नसल्यामुळे अंगण नाही परंतु, घरात छोटी बाल्कनी किंवा गॅलरीत आपण आपल्याला आवडीचे एखादे तरी रोप लावतोच. जागा छोटी असल्यामुळे आणि पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही तर झाडे कोमजतात.(Bitter gourd growing tips) 
वाढत्या उकाड्याचा जितका परिणाम आपल्यावर होतो तितकाच झाडांवर देखील होतो.(Best soil mix for bitter gourd) बाहेरून भाज्या फळे विकत आणण्यापेक्षा आपण त्याची घरीच लागवड करतो परंतु, त्याची पुरेशी काळजी घेतली नाही की रोप सुकते किंवा त्याची पाने पिवळी पडतात.(Bitter gourd gardening tips at home) बहुतेक लोकांना कारली खायला अधिक आवडतात त्यामुळे घरात त्याची वेलही लावतात. अगदी घराच्या खिडकीपासून ती बहरत जाते. उन्हाळा सुरु झाला की, त्याची पाने पिवळी पडतात.(How to revive bitter gourd leaves) वेलीला आलेली कारली ही हळूहळू पिवळी पडतात.(Easy home gardening tips for bitter gourd) त्यावर कीटक, माशा किंवा पक्ष्यांनी टोच मारली की ती त्याची वाढ होत नाही. अशावेळी नेमके काय करावे सुचत नाही. अनेकदा रोपाची वाढ होत नाही, फुले-फळे येत नाही यावेळी ४ गोष्टी लगेच करा. 

२ गोष्टी करा कुंडीतल्या जास्वंदीच्या रोपाला येतील भरपूर फुले, वाळवीही लागणार नाही

उन्हाळ्यात कारले खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. जे आपल्याला अनेक आजारांपासून लांब ठेवतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. परंतु कारल्याची वेल लावल्यानंतर त्यात अनेक कीटक आणि माशा उच्छाद मांडतात. ज्यामुळे वेल लावल्यानंतर ती हळूहळू सुकू लागते. त्यासाठी वेलीच्या मातीत कोणती खते घालायला हवी पाहूया. 

उन्हाळ्यात कुंडीतील रोपं सुकतात-कोमजतात? मातीत घाला 'ही' घरगुती खतं, रोपांना येईल नव्याने बहर...

1. वेलीला पुरेशा प्रमाणात कॅल्शियम मिळवण्यासाठी त्यामध्ये २ चमचे खडूचा पावडर किंवा चुना घालावा. या दोन्ही गोष्टी नसतील तर आपण अंड्याची टरफले मातीत घालू शकतो. ज्यामुळे वेलीला कॅल्शियम तर मिळेलच आणि त्याची वाढ होण्यास सुरुवात होईल. 

2. वेल लावल्यानंतर २० दिवसांनी मातीमध्ये शेणखत किंवा गांडुळ खत घाला. तसेच मातीला सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी रोप लावा. 

3. समुद्र शेवाळी खत हे देखील वेलीसाठी चांगले मानले जाते. यामध्ये असणारे घटक वेलीला बहरण्यास मदत करतात. 

4. चमचाभर मोहरी पाण्यात भिजवून रात्रभर ठेवा. दुसर्‍या दिवशी हे पाणी वेलीला घाला. असे महिन्यातून एकदा केल्याने वेलीला चांगले खत मिळते. 

 

Web Title: gardening tips how to grow bitter ground plants leaves turning in yellow 4 simple ingredients add in soil leaves will blossom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.