Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात मोगऱ्याचे रोप सुकले- काड्याच दिसतात? ४ टिप्स, डिसेंबरमध्येही रोपाला येतील भरपूर मोगऱ्याची फुलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2025 15:04 IST

How to get more mogra flowers: Winter mogra tips: आपण काही घरगुती खत रोपांना घातल्यास रोप पुन्हा नव्याने बहरण्यास मदत होईल.

आपल्यापैकी अनेकांना घराच्या बाल्कनीत, अंगणात फुल झाडे लावण्याची आवड असते. पण अनेकदा रोपाला फुलेच येत नाही, पानं गळून पडतात, पिवळी पडतात म्हणून अनेक लोक आवड असूनही घरात किंवा बाल्कनीत फुलांची रोप लावण्याचे टाळतात. पण सुगंधासाठी ओळखलं जाणारं रोप म्हणजे मोगरा. (How to get more mogra flowers)हिवाळा आला की बागेतील अनेक रोप मंदवतात.(Winter mogra tips) वातावरणातील गारठ्यामुळे माती ओलसर राहाते किंवा घट्ट होते. ज्यामुळे रोपाला फुले येत नाही. उन्हाळ्यात जिथे रोप पांढऱ्या फुलांनी हे रोप बहरुन निघते. पण डिसेंबर-जानेवारी महिन्यात रोपांची हिरवळ कमी होते.(Gardening tips India) पानं गळतात, काड्या दिसतात. अशावेळी आपण काही घरगुती खत रोपांना घातल्यास रोप पुन्हा नव्याने बहरण्यास मदत होईल. 

फ्रिजमध्ये ठेवलेले लिंबू सुकतात- काळे पडतात? ४ टिप्स, महिनाभर रसाळ-ताजे राहतील लिंबू

1. हिवाळ्यात मोगऱ्याच्या रोपाच्या मातीकडे लक्ष द्यायला हवे. पोषक तत्वांनी समृद्ध असलेली माती सगळ्यात चांगली असते. जर माती खूप चिकट किंवा ओली असेल तर मुळे कुजतात. त्यासाठी मातीत आपल्याला कंपोस्ट, वाळू आणि गांडूळ खत घालावा लागेल. यामुळे मुळांना श्वास घेण्यास मदत होईल. 

2. हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो, त्यामुळे झाडांना फुले येत नाही. मोगऱ्याचे रोप आपल्याला चार ते पाच तास सूर्यप्रकाशात ठेवायला हवे. सकाळचा सूर्यप्रकाश रोपांसाठी चांगला असतो. ज्यामुळे कळ्या तयार होण्यास मदत होते. 

3. हिवाळ्यात थंडीपासून रोपाचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गारव्यामुळे कळ्यांना नुकसान पोहचू शकते. रात्रीच्या वेळी रोपांना गारवा लागणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी भिंतीजवळ किंवा शेडजवळ ठेवा. रोपाला प्लास्टिकच्या शीटने देखील झाकू शकता. 

4. हिवाळ्यात झाडांना पाणी देणे देखील गरजेचे आहे. या ऋतूमध्ये जास्त पाणी दिल्याने झाडांच्या मुळांना नुकसान होते. म्हणून मातीचा वरचा थर कोरडा दिसल्यावर पाणी द्या. तसेच झाडांवर कडुलिंबाच्या तेलाची फवारणी करा. यामुळे बुरशी लागणार नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Revive your jasmine plant in winter: Tips for abundant blooms.

Web Summary : Winter can harm jasmine plants, causing leaf drop. Improve soil with compost and ensure sunlight. Protect from frost by moving indoors or covering plants. Water only when the topsoil is dry and use neem oil to prevent fungus.
टॅग्स :बागकाम टिप्सथंडीत त्वचेची काळजी