Join us  

बाल्कनीत झाडं तर लावायची, पण कुंडीचा आकार कसा ठरवाल? ऊन, खत, पाण्याचं काय गणित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 7:04 PM

छोट्या जागेतही खूप छान गार्डनिंग (terrace gardening) करता येते. अगदी कुंडीतही (planters) झाडे जोमाने वाढतात. फक्त त्यासाठी कुंडीचा आकार, झाडांना घालायचं खत, पाणी आणि ऊन यांचं गणित जमलं पाहिजे...

ठळक मुद्देछोट्या जागेत एकावर एक या पद्धतीने जरी कुंड्या बसविल्या तरी तुम्ही ८- १० झाडे आरामात लावू शकता.त्यासाठी फक्त झाडांच्या बाबतीत काही पथ्ये पाळण्याची गरज असते. 

आजकाल फ्लॅट सिस्टिम वाढल्यामुळे गार्डनिंग करताना किंवा घराचा हिरवा कोपरा सजविताना खूप अडचणी येतात. हल्ली मोठ्या शहरांमध्ये तर अनेक घरांमध्ये एकही बाल्कनी किंवा टेरेस नसते. खिडक्यांचा आकार मोठा करूनच तेथे सुर्यप्रकाश येईल, याची व्यवस्था केली जाते. त्यामुळे ज्यांना छोटीशी का होईना पण बाल्कनी आहे, ते निदान त्यांची गार्डनिंगची हौस तरी भागवू शकतात. छोट्या जागेत एकावर एक या पद्धतीने जरी कुंड्या बसविल्या तरी तुम्ही ८- १० झाडे आरामात लावू शकता. कुंडीतली झाडंही खूप जाेमाने, भराभर वाढतात आणि आपल्या घराचा एक कोपरा खरोखरंच हिरवा करून टाकतात. त्यासाठी फक्त झाडांच्या बाबतीत काही पथ्ये (proper proportion of water, sunlight and fertilizers to plants in terrace) पाळण्याची गरज असते. 

 

कुंडीतल्या झाडांची अशी घ्या काळजीHow to take care of plants in planters- झाडांना जर दिवसातले काही तासच सूर्यप्रकाश मिळत असेल तर दर आठवड्याला कुंडी ९० अंशात फिरवावी. कुंडी फिरवताना एकच दिशा ठेवावी. - अनेकदा इनडोअर प्लान्ट्सवर धुळ चढते. ही धुळ वेळीच साफ करावी. अन्यथा पानांना सुर्यप्रकाश घेण्यास अडचण होते आणि ती टवटवीत दिसत नाहीत.- वाळलेली पाने- फुले झाडांवरून नियमितपणे काढून टाकावीत.

डेझर्ट रोज, ॲडेनिअमचा घर प्रसन्न करणारा बहर! कशी घ्याल झाडाची योग्य काळजी- आपण लावलेल्या झाडाव्यतिरिक्त कुंडीत काही हिरवे गवत, तण किंवा दुसरे झाड वाढत असेल, तर ते काढून टाकावे. कारण यामुळे आपण लावलेल्या झाडाची वाढ चांगली होत नाही.- दर दोन- तीन महिन्यांनी झाडांची कटींग करावी. यामुळे झाडांची वाढ झरझर होते.- तसेच दोन- तीन महिन्यांतून एकदा कुंडीतील मातीही खुरप्याने खाली- वर करा. असं करताना झाडाच्या मुळांना धक्का लागणार नाही, याची काळजी घ्या.- घरात काही एक्स्पायरी झालेल्या औषधी गोळ्या असतील, तर त्याचा चुरा करा आणि पाण्यात मिक्स करून ते पाणी झाडांना द्या. यामुळे झाडांना कीड लागत नाही. 

 

कुंडीचा आकार कसा निवडायचा..How to select the proper shape and size of planters for terrace garden?- जागेची अडचण असेल तर १२ इंची कुंड्या आणून तुम्ही गार्डन सजवू शकता. जास्वंद, गुलाब, कन्हेर यासारखी फुलांची झाडे किंवा मोठी वाढणारी शोभेची झाडे, झुडूपाप्रमाणे वाढणाऱ्या झाडांच्या जाती अशा सगळ्यांसाठी १२ इंची कुंडी पुरेशी आहे.- ही कुंडी जास्त मोठीही नाही आणि छोटीही नाही. त्यामुळे तिच्यामध्ये झाडांची वाढ चांगली होते.

घरी कुणी नसताना झाडं सुकतात, पाणी कोण घालणार? हा घ्या भन्नाट उपाय, झाडं हिरवीगार!- शोभेच्या झाडांसाठी तुम्ही मध्यम किंवा छोट्या आकाराच्या कुंड्याही वापरू शकता.- उन्हाळा सोडून इतर ऋतूंमध्ये मोठ्या आकाराच्या शोभेच्या झाडांनाही रोज पाणी देण्याची गरज नसते. त्यांना एक दिवसाआड पाणी द्या. अन्यथा अतिपाण्याने ते खराब होतील.- इनडोअर प्लान्ट्सच्या बाबतीत मात्र कुंडीतील माती सुकली तरच पाणी घालावे आणि ते देखील अगदीच एकावेळी २ टेबलस्पून एवढ्याच प्रमाणात. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सगच्चीतली बागपाणी