हिवाळा सुरु झाला की वातावरणात गारवा वाढतो. ज्याचा आपल्या आरोग्यासह अनेक गोष्टींना त्रास होतो. थंडी सुरु झाली की घरातील फुलझाडांना जास्त त्रास होतो.(Hibiscus plant care) उन्हाळा- पावसाळ्यात हिरवीगार दिसणारी जास्वंदीचे रोप अचानक कोमेजून जाते, पाने पिवळी पडतात, कळ्या येत नाही तसेच त्याची वाढ देखील थांबते.(Hibiscus leaves turning yellow) अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वातावरणातील गारवा, कोरडी हवा आणि अचानक मातीतील कमी होणारी आर्द्रता यामुळे रोपाला पुरेशा प्रमाणात पोषण मिळत नाही. (Winter plant care tips)
बरेचदा यामुळे आपल्याला असं वाटतं की रोप मरतंय किंवा थंडीत चुकीची निगा, मातीतील पोषण संतुलन बिघडते. जास्वंद हे उष्ण कटिबंधातील रोप असल्याने त्याला धूप, उबदार हवा आणि हलकी आर्द्रतेची गरज असते.(How to save hibiscus plant) हिवाळ्यात माती थंड होते, पाणी शोषण्याचा वेग कमी होतो त्यामुळे रोपाला पोषण मिळत नाही. अशावेळी काही योग्य खतं मातीत घातल्यास रोप नव्याने बहरण्यास मदत होईल.
वयाच्या चाळिशीतही दिसाल मॉर्डन अन् ट्रेंडी! प्रत्येक महिलेकडे हव्याच ५ साड्या, दिसाल एकदम क्लासिक
जास्वंदीच्या रोपांना हिवाळ्यात कळ्या येत नाही. पाने पिवळी पडतात किंवा गळतात. रोपाला पुरेशा प्रमाणात आर्द्रता मिळाली नाही तर त्याला बुरशी लागते. यासाठी रोपाला ६ ते ७ तास सूर्यप्रकाशात ठेवा. रोपाला सूर्यप्रकाश मिळाला नाही तर कळ्या येत नाही. हिवाळ्यात माती लवकर सुकत नाही, त्यामुळे जास्त पाणी दिल्याने मुळे कुजतात. त्यासाठी आठवड्यातून फक्त १ ते २ वेळा पाणी द्या. पाणी देण्यापूर्वी माती तपासा. वरची माती कोरडी वाटत असेल तरच पाणी घाला. जर पाने पिवळी पडत असतील आणि माती ओली राहिली असेल तर हे जास्त पाणी दिल्यामुळे होऊ शकते.
हिवाळ्यात जास्वंदीच्या रोपाला जास्त खतांची आवश्यकता नसते. त्यासाठी घरगुती आणि सहज उपलब्ध होणारी खते त्यात घालायला हवी. स्वयंपाकघरातील कंपोस्ट हे रोपांसाठी सगळ्यात चांगला पर्याय आहे. महिन्यातून एकदा २-३ मूठभर कंपोस्ट टाकल्याने वनस्पती हळूहळू पोषक तत्वे शोषण्यास मदत करते आणि थंडीतही त्याची मुळे सक्रिय ठेवते.
थंडीत तुळशीचे रोप राहिल हिरवेगार-टवटवीत! मातीत मिसळा १ गोष्ट, भरगच्च पानांनी बहरेल तुळस
मातीमध्ये आपण केळीच्या सालीची पावडर पोटॅशियम झाडाला ऊर्जा देते. वाळलेल्या केळीच्या साली बारीक करुन मातीत १ ते २ चमचे मिसळा. कडुलिंबाची पेंड पावडर. हे रोपाला पोषण देत नाही तर बुरशी आणि कीटकांवरही नियंत्रण ठेवते. महिन्यातून १ चमचा पुरेसे असते.
