Join us

नर्सरीतून रोपं आणताना कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्या? ४ टिप्स- हिवाळ्यातली फुलझाडांची खरेदी होईल परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2024 14:11 IST

Gardening Tips For Shopping Quality Flowering Plants: हिवाळ्यात तुमच्या बागेसाठी फुलझाडांची खरेदी करणार असाल तर या काही टिप्स लक्षात ठेवा..(gardening tips for winter)

ठळक मुद्देबऱ्याचदा असं होतं की आपण नर्सरीतून एखादं छान दिसणारं रोप घरी आणतो. घरी आणल्यानंतर ते आपल्या कुंडीत लावतो. पण कुंडीत लावल्यानंतर काही दिवसातच ते सुकून जातं.

रोपं लावण्यासाठी जसा पावसाळा हा चांगला ऋतू असतो तसाच हिवाळा देखील अतिशय उत्तम असतो. हिवाळ्यात लावलेली रोपं चटकन रुजतात आणि छान जोमाने वाढतात. कारण वातावरणातला गारवा रोपांसाठी पोषक ठरतो (gardening tips for winter). त्यामुळे हिवाळ्यात फुलझाडांची खरेदी आवर्जून करा (how to choose best growing plants from nursery?). पण फुलझाडांची खरेदी करत असताना नेमक्या कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्या ते पाहा.(Gardening Tips For Shopping Quality Flowering Plants)

 

फुलझाडांची खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्या?

बऱ्याचदा असं होतं की आपण नर्सरीतून एखादं छान दिसणारं रोप घरी आणतो. घरी आणल्यानंतर ते आपल्या कुंडीत लावतो. पण कुंडीत लावल्यानंतर काही दिवसातच ते सुकून जातं.

सकाळी उठावंच वाटत नाही- दिवसभर अंगात आळस असतो? १ उपाय- दिवसभर उत्साही, ॲक्टीव्ह राहाल

पान पिवळी पडतात किंवा गळून जातात. नर्सरीमध्ये छान टवटवीत असणारं रोप घरी आणताच काही दिवसांतच असं कसं सुकून गेलं हा प्रश्न पडतो. असं पुन्हा तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून या काही गोष्टींची आधीच खात्री करा आणि मगच ते रोप घरी आणा. 

 

नर्सरीतून रोप घरी आणताना...

नर्सरीतून रोप घरी आणताना कोणत्या गोष्टींची खात्री करून घेतली पाहिजे याची माहिती mothernaturemellows या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहा..

१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ऑनलाइन रोपांची खरेदी करणे टाळा. कारण तुम्ही जे राेप घेणार आहात ते तुमच्या नजरेने, हातात घेऊन व्यवस्थित तपासूनच आणलेलं बरं. 

लग्नसराईसाठी दागिने- कपडे कसे घ्यावे? करिना कपूरकडून घ्या फॅशन टिप्स- सगळ्यांपेक्षा सुंदर दिसाल

२. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे रोप घेणार असाल ते छान भरीव, बहरलेलं हवं. आजूबाजूने त्या रोपाची वाढ होते आहे की नाही ते तपासून घ्या. तसेच त्या रोपावर कुठेही किडा, अळी किंवा पांढरा मावा पडलेला तर नाही ना हे तपासून घ्या. ज्या रोपांच्या पानांवर छिद्रं दिसतात, असं रोप घेणंही टाळावं.

३. भरपूर फुलं आलेलं रोप घेणं टाळा. त्याऐवजी ज्या रोपाला अगदी एखादे दुसरेच फुल आहे, पण कळ्या मात्र बऱ्याच आलेल्या आहेत असं रोप निवडा.

४. जे रोप जमिनीमध्ये व्यवस्थित रुजलेलं असतं, ज्याची मुळं पक्की असतात अशाच रोपाची निवड करावी. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सथंडीत त्वचेची काळजीइनडोअर प्लाण्ट्स