Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > गुलाबाची काडी ‘अशी’ लावा कुंडीत, इतके गुलाब सुंदर फुलतील की पान दिसणार नाही..

गुलाबाची काडी ‘अशी’ लावा कुंडीत, इतके गुलाब सुंदर फुलतील की पान दिसणार नाही..

Gardening Tips For Rose Plant: पुढे सांगितलेल्या पद्धतीने जर कुंडीत गुलाबाचं रोप लावलं तर निश्चितच त्या रोपाला कमीतकमी दिवसांतच खूप भरभरून फुलं येतील...(home hacks for blooming rose plant)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2026 15:12 IST2026-02-01T09:37:31+5:302026-02-02T15:12:48+5:30

Gardening Tips For Rose Plant: पुढे सांगितलेल्या पद्धतीने जर कुंडीत गुलाबाचं रोप लावलं तर निश्चितच त्या रोपाला कमीतकमी दिवसांतच खूप भरभरून फुलं येतील...(home hacks for blooming rose plant)

gardening tips for rose plant, home hacks for blooming rose plant  | गुलाबाची काडी ‘अशी’ लावा कुंडीत, इतके गुलाब सुंदर फुलतील की पान दिसणार नाही..

गुलाबाची काडी ‘अशी’ लावा कुंडीत, इतके गुलाब सुंदर फुलतील की पान दिसणार नाही..

Highlightsछोट्याशा गुलाबालाही भरपूर फुलं यावीशी वाटत असतील तर .....

बऱ्याचदा असं होतं की आपण हौशीने लावलेलं गुलाबाचं रोप व्यवस्थित वाढतच नाही. त्याची चांगली वाढ होत नाही. भरपूर पानं येत नाहीत. त्यामुळे मग अगदी काड्या जास्त आणि पानं कमी अशी त्याची अवस्था होऊन जाते. अशा रोपाला मग म्हणावी तशी फुलंही येत नाही. अगदी क्वचित कधीतरी एखादी कळी उमलल्यासारखी दिसते (gardening tips for rose plant). म्हणूनच हे सगळं टाळायचं असेल आणि छोट्याशा गुलाबालाही भरपूर फुलं यावीशी वाटत असतील तर गुलाबाचं रोप लावताना पुढे सांगितलेल्या काही गोष्टींची काळजी घ्या..(home hacks for blooming rose plant)

 

छोट्या कुंडीत गुलाबाचं रोप कसं लावावं?

कुंडीमध्ये गुलाबाचं रोप लावण्यासाठी कुंडीचा आकार खूप महत्त्वाचा आहे. अगदी लहान आकाराची कुंडी गुलाबासाठी निवडू नका. साधारण १० ते १२ इंच एवढी आकाराची कुंडी घ्या. त्या कुंडीच्या तळाशी ४ ते ५ छिद्रं पाडून घ्या, जेणेकरून पाण्याचा योग्य तो निचरा होईल.

'या' लोकांनी बीटरुट खाणं टाळायलाच हवं, आजार मागे लागून तब्येत बिघडण्याचा धोका

यानंतर गुलाबासाठी कोणतंही महागडं खत किंवा सॉईल मिक्स आणण्याची गरज नाही. त्यासाठी ४० टक्के माती, ३० टक्के गांडूळ खत किंवा शेणखत, २० टक्के वाळू आणि १० टक्के कोकोपीट असं घालून माती तयार करा. अशा पद्धतीच्या मातीमध्ये गुलाबाचं रोप भरभरून वाढतं. सगळ्यात आधी कुंडीमध्ये थोडे विटांचे तुकडे किंवा दगड घाला आणि नंतर माती भरा. यामुळे रोपांची मुळं सडत नाहीत.

 

यानंतर ही कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे तिला ४ ते ५ तास भरभरून ऊन मिळेल.

Gen-Z ला आवडतेय 'या' खास डिझाईनची अंगठी- आलिया भटचं मंगळसूत्रही होतं अगदी तसंच...

मातीचा वरचा थर कोरडा झाला की मगच पाणी द्या आणि आठवड्यातून एकदा अगदी पातळ ताक, केळीच्या सालींचं पाणी, बटाट्याच्या सालांचं तसेच कांद्यांच्या टरफलांचं पाणी रोपांना घाला. हे घरगुती पदार्थ रोपांची भरभरून वाढ होण्यासाठी आणि भरपूर फुलं येण्यासाठी नक्कीच मदत करतील. 

 

Web Title : गुलाब के पौधे को गमले में लगाने का सही तरीका और पाएं ढेर सारे फूल।

Web Summary : अधिक फूल पाने के लिए सही आकार (10-12 इंच) का गमला चुनें जिसमें जल निकासी हो। 40% मिट्टी, 30% खाद, 20% रेत और 10% कोको पीट का उपयोग करें। प्रतिदिन 4-5 घंटे धूप सुनिश्चित करें। ऊपरी मिट्टी सूखने पर पानी दें और सर्वोत्तम विकास के लिए साप्ताहिक रूप से पतला छाछ या सब्जी के छिलके का पानी डालें।

Web Title : Grow abundant roses: Potting tips for a flower-filled plant.

Web Summary : Want more flowers? Choose the right pot size (10-12 inches) with drainage. Use 40% soil, 30% compost, 20% sand, and 10% coco peat. Ensure 4-5 hours of daily sunlight. Water when the topsoil dries and add diluted buttermilk or vegetable peel water weekly for best growth.