पावसाळा सुरु झाल्यानंतर झाडे फुलांनी बहरुन जातात.(gardening tips) या काळात आपण जितकी आरोग्याची काळजी घेतो तितकीच आपल्याला रोपांची देखील घ्यावी लागते.(Monsoon plant care ) घरातल्या बाल्कनीत किंवा अंगणात फुलांचा मंद सुगंध पसरु लागला की, दिवसाची सुरुवात अगदी छान होते. आपल्या आसपासच वातावरण अगदी सुगंधित करणारं रोप म्हणजे मोगरा.(Jasmine plant tonic) याच्या सुवासाने वातावरण अगदी प्रसन्न वाटू लागते. नर्सरी किंवा रस्त्याच्या कडेला मिळाणाऱ्या मोगऱ्याला पाहाताच क्षणी आपण त्याला घरातील कुंडीत लावतो पण घरी आणताच कोमेजून जातं, त्याला फुलंच येत नाही.(Mogra plant care tips) पावसाळ्यात मोगऱ्याच्या रोपाला कळ्या येण्यासाठी काय करावं? त्याच कोणत्याप्रकारचं खतं घालावं हे जाणून घेऊया.
गुलाबाच्या रोपाला कळ्या लागतात पण उमलत नाही, गळून जातात? ४ टिप्स- गुलाबाच्या फुलांनी वाकेल झाड
मोगऱ्याच्या रोपाला भरपूर फुले येण्यासाठी उपाय
1. रोपाच्या मुळांना हवा आणि पुरेशा प्रमाणात मातीत मिळणं गरजेचे असते. यासाठी रोपाच्या देठाभोवती २ ते ३ इंच खोल माती काढून घ्या. यामध्ये मुळांना नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. तसेच तण आणि सुकलेली पाने काढून टाका. यामुळे मोगऱ्याचे रोप स्वच्छ राहिल. त्याला पुरक अशी माती मिळेल.
2. झाडाला आवश्यक पोषण मिळण्यासाठी सेंद्रिय खत खूप महत्त्वाचे असते. मातीत ३ ते ४ मूठभर गांडूळखत किंवा शेणखत घाला. या खतांमुळे रोपाला पोषण मिळते. ज्यामुळे रोप पुन्हा बहरु लागते. यामुळे मातीची सुपीकता आणि पाणी धरुन ठेवण्याची क्षमता देखील सुधारता येते.
3. डीएपी खत फुलांच्या वाढीसाठी आवश्यक असते. यात फॉस्फरस आणि नायट्रोजन असते. गांडूळखत किंवा शेणखत घातल्यानंतर कुंडीत डीएपी खताचे काही दाणे घाला. ६-८ इंचाच्या कुंडीसाठी ८-१० दाणे पुरेसे असतील. हे थेट देठाजवळ घालू नका. यामुळे मुळांना नुकसान होऊ शकते. हे रासायनिक खत असल्यामुळे रोपाला नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.
4. रोपाचा आकार, फुलांचा रंग आणि कीड लागू नये म्हणून मोगऱ्याला पोटॅश अधिक आवश्यक आहे. हे विकत आणून अर्धा लिटर पाण्यात पोटॅशची एक छोटे झाकण विरघळवा. हे पाणी कुंडीत घाला. हे रोपांच्या मुळांपर्यंत पोहोचून फुले येण्यास मदत करेल.
या गोष्टी लक्षात ठेवा.
1. खत घातल्यानंतर रोपाला पाणी घाला. माती ओलसर ठेवा पण त्यात पाणी साचू देऊ नका.
2. मोगऱ्याच्या रोपाला पावसाचे पाणी द्या. कुंडी पाण्याने भरली तर ती रिकामी करा.
3. मोगऱ्याच्या रोपाला किमान ५ ते ६ तास सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे. त्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा.
4. फुले फुलल्यानंतर पिवळी किंवा कोमजलेली पाने काढून टाका. वेळोवेळी झाडाकडे लक्ष द्या. यामुळे झाडाची वाढ होऊन मोगऱ्याला फुले येतील.