Join us
Daily Top 2Weekly Top 5

कढीपत्त्याची पाने गळाली, रोप सुकले? मातीत मिसळा पांढरा पदार्थ, हिवाळ्यातही रोपाला येईल भरपूर हिरवागार कढीपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2025 11:44 IST

curry leaf plant care: curry leaves falling problem: curry plant winter care: अनेकदा आपण रोपाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी महागडी खते किंवा काही केमिकल्सचा वापर करतो.

घरच्या स्वयंपाकघरात कढीपत्त्याशिवाय पदार्थ अपूर्णच वाटतो. फोडणे असो, आमटी, भाजी किंवा उसळ यांसारख्या पदार्थांमध्ये कढीपत्ता जेवणाची चव वाढवतो.(curry leaf plant care) अनेकांना विकतचा कढीपत्ता आणण्याऐवजी घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात विविध झाडे लावण्याची हौस असते. त्यातील एक कढीपत्त्याचे रोप.(curry leaves falling problem) हिवाळा सुरु झाला की मातीत ओलावा राहतो. रोप सुकते, पाने पिवळी पडतात किंवा गळतात. रोपाची वाढ होत नाही. थंडीच्या दिवसांत कढीपत्त्याच्या रोपावर परिणाम जास्त होतो.(curry plant winter care) कमी ऊन, जास्तीचा ओलावा किंवा चुकीच्या मातीमुळे रोप हळूहळू कमजोर होऊ लागते. अनेकदा आपण रोपाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी महागडी खते किंवा काही केमिकल्सचा वापर करतो. पण याने झाडाला पुरेशा प्रमाणात पोषण मिळत नाही. अशावेळी आपण महागड्या खत घालण्याऐवजी उरलेले दही मातीत रोवू शकतो.

कुठल्याही साडीवर मॅच होणारे पाहा सुंदर ६ ब्लाऊज, पैसे वाचवा आणि साडी नेसून दिसा हॉट स्टायलिश

दही हे नैसर्गिक प्रोबायोटिक असून त्यात गूड बॅक्टेरिया असतात. हे जिवाणू मातीतील सूक्ष्मजीव सक्रिय करतात, मुळांना पोषण देतात आणि रोपाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. जर आपल्या घरात उरलेले, खूप जुने, आंबट दही असेल तर ते खत म्हणून वापरु शकता. यासाठी १ लिटर पाण्यात दही पूर्णपणे मिसळून त्याचे द्रावण तयार करा. हे द्रावण मातीत टाकल्याने झाडांना आवश्यक पोषण मिळते. तसेच मातीची सुपीकता देखील वाढते. हे दह्याचे द्रावण झाडांना सक्रिय ठेवण्याचे काम करते. झाडांच्या वाढीस देखील मदत करते. आपण हे पाणी दर १५ ते २० दिवसांनी झाडांच्या मुळांजवळ ओतू शकता. ज्यामुळे पाने हिरवी राहतात आणि रोप मजबूत होण्यास मदत होते. 

हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी होतो. त्यासाठी दररोज सकाळी किमान ३ ते ४ तास कढीपत्त्याच्या पानाला सूर्यप्रकाश द्या. गारव्यामुळे आणि दवबिंदूमुळे रोपांचे संरक्षण करणे जास्त महत्त्वाचे आहे. आपण रोपाला खिडकी जवळ ठेवू शकतो. हिवाळ्यात माती हळूहळू सुकते. त्यामुळे रोज रोपाला पाणी देण्याची गरज नाही. मातीच्या ओलाव्यानुसार पाणी द्या. ३ ते ४ दिवसांनी एकदा पाणी देणे पुरेसे आहे. जास्त पाणी दिल्याने मुळे कुजतात आणि झाड मरते. योग्यप्रकारे रोपाची काळजी घेतली तर हिवाळ्यातही रोपाला हिरवागार कढीपत्ता येईल.  

English
हिंदी सारांश
Web Title : Revive Curry Leaf Plant: Yogurt Trick for Lush Winter Growth

Web Summary : Curry leaf plants often struggle in winter. Use diluted yogurt as a natural fertilizer every 15-20 days. Ensure 3-4 hours of daily sunlight and water only when the soil is dry. This helps keep the plant healthy and green.
टॅग्स :बागकाम टिप्सथंडीत त्वचेची काळजी