घर छोटं असो किंवा मोठं असो, त्या घराच्या आजुबाजुला काही रोपं, झाडं पाहिजेतच. कारण त्यांच्याशिवाय घराच्या आजुबाजुचं वातावरण प्रसन्न वाटत नाही. आता तर घराच्या आजुबाजुलाच नाही तर घरामध्येही रोपं ठेवण्याचा ट्रेण्ड आहे. त्यामुळे तर घराला आणखीनच शोभा येते. काही जणांना फुलझाडांची खूप आवड असते. आणि त्यातही जर सुगंधित फुलं असतील तर मग क्या बात है.. अशी काही सुगंधी फुलझाडांची रोपं तुम्ही बाल्कनीमध्येही छोट्या जागेत लावू शकता. त्यामुळे तुमची बाल्कनी आणि घरही अगदी सुगंधाने भरून जाईल. अशी रोपं कोणती आहेत ते पाहूया..(flowering plants that can grow in small place)
बाल्कनीत लावता येतील अशी सुगंधी फुलांची रोपं
१. मोगरा
उन्हाळा हा मोगऱ्याचा हंगामी ऋतू. उन्हाळ्यात मोगऱ्याला भरपूर बहर येतो. त्यामुळे अगदी आताच मोगऱ्याचं रोप नर्सरीतून आणा आणि तुमच्या बाल्कनीमध्ये लावून टाका.
दुचाकी चालवून हात खूप काळे पडतात? कॉफीचा 'हा' मास्क लावा - हात होतील स्वच्छ, उजळ
या रोपाला अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला ४ ते ५ तास चांगलं ऊन मिळेल. मोगऱ्याच्या रोपाला १० ते १२ इंच आकाराची कुंडी पुरेशी आहे. शिवाय या रोपाला भुसभुशीत माती हवी. त्यामुळे कुंडीमध्ये थोडी वाळू किंवा रेतीदेखील टाका. त्यामुळे पाण्याचा चांगला निचरा होईल.
२. मधुकामिनी
मोगऱ्याप्रमाणेच अतिशय सुगंधी असणारं दुसरं रोप म्हणजे मधुकामिनी. मधुकामिनीचं राेप देखील १० ते १२ इंच आकाराच्या कुंडीमध्ये चांगलं येऊ शकतं. या रोपालाही उन्हाची गरज असते. त्यामुळे ४ ते ५ तास ऊन मिळेल अशा ठिकाणी मधुकामिनीची कुंडी ठेवा.
फक्त ४ लवंगा आणि १ ग्लास पाणी- तब्येतीच्या कित्येक तक्रारी गायब, वाचा लवंगाचं पाणी पिण्याचे ५ फायदे
या रोपाला शेणखत, गांडूळ खत किंवा केळीच्या सालांचं पाणी तुम्ही देऊ शकता. मधुकामिनीची फुलं आकाराने छोटीशी असतात. पण त्यांना सुगंध मात्र भरपूर असतो. रात्रीच्या वेळी मधुकामिनीची फुलं उमलतात आणि आजुबाजुच्या वातावरणात मंद सुगंध भरून राहातो.
