>हिरवा कोपरा > फ्लॉवरपॉट मधील फुलं खूप दिवस टवटवीत रहावी असं वाटतं ना? करा ५ पदार्थांचा स्मार्ट उपयोग...

फ्लॉवरपॉट मधील फुलं खूप दिवस टवटवीत रहावी असं वाटतं ना? करा ५ पदार्थांचा स्मार्ट उपयोग...

फ्लॉवरपॉटमधील फुलं काही तासांतच सुकून जातात का, मग हे काही उपाय करून बघा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 05:53 PM2021-09-21T17:53:40+5:302021-09-21T17:54:13+5:30

फ्लॉवरपॉटमधील फुलं काही तासांतच सुकून जातात का, मग हे काही उपाय करून बघा.. 

Do you think the flowers in the flowerpot should bloom for many days? Make smart use of 5 foods ... | फ्लॉवरपॉट मधील फुलं खूप दिवस टवटवीत रहावी असं वाटतं ना? करा ५ पदार्थांचा स्मार्ट उपयोग...

फ्लॉवरपॉट मधील फुलं खूप दिवस टवटवीत रहावी असं वाटतं ना? करा ५ पदार्थांचा स्मार्ट उपयोग...

Next
Highlightsसोडा टाकल्यामुळे जसे इडली, ढोकळा हे पदार्थ फुलून येतात तसेच फुलांचे सौंदर्यही अधिक खुलते.

आपल्या बागेत फुलणारी किंवा एखाद्या बुकेमधे आलेली काही फुलं आपल्याला खूप आवडतात आणि म्हणून ती चटकन आपल्या डोळ्यांना दिसतील, अशा पद्धतीने आपण त्यांना सजवून ठेवतो. पण हे सूख थोडा वेळंच टिकतं. कारण काही काळातच फ्लॉवरपॉटमधील फुले सुकून जातात आणि आपला हिरमोड होतो. म्हणूनच तर फ्लॉवरपॉटमधील फुलं अधिक काळपर्यंत टिकून रहावीत म्हणून काही सोपे उपाय करून बघा. या उपायांमुळे तुमच्या फ्लॉवरपॉटमधील फुलं अधिक काळपर्यंत टवटवीत राहतील आणि त्यामुळे तुमचे घरही प्रसन्न आणि फ्रेश वाटू लागेल. 

 

१. मीठ आणि साखर
फ्लॉवरपॉटमध्ये फुलं सजवून ठेवायची असतील तर ती कधीच नुसत्या पाण्यात टाकून ठेवू नका. साधारण अर्धा ग्लास जर पाणी घातलं असेल तर त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर टाका. यामुळे फुलं अधिककाळ फ्रेश राहतात. 

 

२. खाण्याचा सोडा
फुलांचा सोडा टिकविण्यासाठी खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा अतिशय उपयुक्त ठरतो. सोडा टाकल्यामुळे जसे इडली, ढोकळा हे पदार्थ फुलून येतात तसेच फुलांचे सौंदर्यही अधिक खुलते. फ्लॉवरपॉटमध्ये टाकण्यासाठी जर एक ग्लास पाणी घेत असाल तर त्या पाण्यात एक टेबलस्पून सोडा टाका. पाणी व्यवस्थित ढवळून घ्या आणि आता त्यामध्ये फुलांना सजवा. जर तुम्ही फुलं सजविण्यासाठी पारदर्शक बाऊल वापरणार असाल तर त्यासाठी क्लब सोडा वापरा. त्यामुळे आतले पाणी पांढरट न दिसता नितळ दिसेले.

 

३. हेअर स्प्रे
हा उपाय वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हेअर स्प्रे जर फुलांवर शिंपडला तर नक्कीच फुले अधिक काळ टवटवीत राहण्यास मदत होते. 

४. व्हिनेगर 
फ्लॉवर पॉटमध्ये जर एक ग्लास पाणी घेतले असेल तर त्यात दोन चमचे साखर आणि दोन चमचे व्हिनेगर मिसळा. यामुळे फुलांचे सौंदर्य अधिक काळ टिकून राहण्यास मदत होते.  

 

Web Title: Do you think the flowers in the flowerpot should bloom for many days? Make smart use of 5 foods ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Gardening Tips : घरच्याघरीच पिकवता येतील रसाळ लिंबू; 'या' ट्रिक्स वापरून १ ते २ किलो लिंबू सहज मिळवा - Marathi News | Gardening Tips : How to grow lemon plant in pot | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरच्याघरीच उगवता येतील रसाळ लिंबू; 'या' ट्रिक्स वापरून १ ते २ किलो लिंबू सहज मिळवा

Gardening Tips :थोडी मेहनत करून तुम्ही लिंबू सहज वाढवू शकता आणि तेही केमिकल्समुक्त. यासाठी तुम्हाला काही गोष्टींचीही आवश्यकता असेल.  ...

इनडोअर प्लांट्स दिसतात छान, पण असतात नाजूक! इनडोअर प्लांट्सनी कसं सजवाल घर, कशी घ्यायची काळजी? - Marathi News | Indoor plants look great, but are fragile! How to take care of indoor plants? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इनडोअर प्लांट्स दिसतात छान, पण असतात नाजूक! इनडोअर प्लांट्सनी कसं सजवाल घर, कशी घ्यायची काळजी?

इनडोअर प्लांट्स घरात आणले आणि अवघ्या काही दिवसात कोमेजून गेले असा तुमचाही अनुभव आहे का? मग इनडोअर प्लांट्सची काळजी घेण्याच्या या काही टिप्स. ...

झाडांना रोज पाणी घालावं का? किती घालावं? सकाळी की सायंकाळी?- हिरव्यागार बागेचे रहस्य - Marathi News | Should plants be watered daily? How much to add? Morning or evening? - The secret of the green garden | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झाडांना रोज पाणी घालावं का? किती घालावं? सकाळी की सायंकाळी?- हिरव्यागार बागेचे रहस्य

झाडांना पाणी देणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळतं. पण किती पाणी घालावं आणि केव्हा घालावं, हे समजत नाही. त्यामुळे कधी झाडांना अतिपाणी होतं तर कधी झाडं सुकून जातात.  ...

गुलाबाच्या झाडावर किड पडली, फुलं फार कमी येतात? हे उपाय करा, गुलाबाचे झाड छान बहरेल! - Marathi News | Gardening tips: Do this remedy, the rose tree will bloom nicely! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाच्या झाडावर किड पडली, फुलं फार कमी येतात? हे उपाय करा, गुलाबाचे झाड छान बहरेल!

बागेतला गुलाब सुकला असेल किंवा त्याला फुलंच येत नसतील, तर काही गोष्टी चुकत आहेत. त्या कोणत्या, हे जाणून घ्या. ...

फुल और कांटे! आठवा, कधी तुम्ही शेवटचा मातीत हात घातला, किती झाडं ओळखता येतात? - Marathi News | why gardening gives you joy of lifetime create your own green happiness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फुल और कांटे! आठवा, कधी तुम्ही शेवटचा मातीत हात घातला, किती झाडं ओळखता येतात?

बागकाम हेच जीम असं कुणी सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवाल, पण फिटनेस आणि क्रिएटिव्हिटीचं हे एक खास नवं रुप म्हणून स्वीकारता येईल! ...

कुंडीतल्या मातीला वाळवी लागली, झाडं सुकून चालली? खराब झाली म्हणून माती फेकू नका, 'हे' उपाय करा.. - Marathi News | Gardening tips for the better growth of plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतल्या मातीला वाळवी लागली, झाडं सुकून चालली? खराब झाली म्हणून माती फेकू नका, 'हे' उपाय करा..

पावसाळ्यात बऱ्याचदा असं होतं की कुंडीमधल्या मातीला कीड लागते किंवा वाळवी लागते अणि झाडं सुकतात. असं झालं तर लागेचच माती फेकून देऊ नका. काही सोपे उपाय करून बघा. ...