आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरले जाणारे मसाले हे खरंतर अनेक आजारांवर खजिना आहे. यातीलच एक लवंग.(Gardening Tips) लवंग हा मसाला फक्त पदार्थांची चव वाढवण्यासाठीच नाही तर औषधी गुणधर्मांसाठी देखील ओळखला जातो. सध्या वाढत्या महागाईमुळे आपण घरच्या घरी काही भाज्या किंवा मसाले उगवण्याचा प्रयत्न करतो.(kitchen gardening clove plant tips) खिडकीत किंवा छोट्याशा बाल्कनीत आपल्या आवडीचे रोप वाढवतो. (Lavangache Rop) पण अनेकांना असं वाटतं की लवंगाचं झाड खूप मोठं असतं.(how to grow clove plant in pots) पण या रोपाला वाढवण्यासाठी फारशी जागा लागत नाही. छोट्याशा कुंडीतही लवंगाचे रोप लावता येईल. त्यामुळे किचन गार्डनिंग हा यासाठी उत्तम पर्याय आहे.(clove plant care at home) छोट्याशा बाल्कनीत, गॅलरीत किंवा घराच्या खिडकीजवळ अशा औषधी मसाल्यांची झाडं लावली तर स्वयंपाकघर नेहमीच सुगंधी राहील. घरी छोट्या कुंडीत लवंगाचे रोप लावण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया. (easy tips for clove plant growth)
छोट्याशा कुंडीत बोगनवेलियाचं झाड वाढवण्याची सोपी ट्रिक, बाल्कनीत बहरतील रंगबेरंगी फुले
लवंगाचे झाड हळूहळू वाढणारे आहे. त्यासाठी आपल्याला कुंडी मोठी आणि खोल घ्यावी लागेल. किमान १८ इंच खोल आणि रुंद कुंडी निवडा. माती पाणी धरुन ठेवणारी आणि चांगली निचरा होणारी असायला हवी. कुंडीतील माती, वाळू आणि कंपोस्ट समान भागांमध्ये मिसळून मिश्रण तयार करा.
लवंगाची लागवड दोन पद्धतीने करता येते. बियांपासून किंवा लहान रोपांपासून. बियांपासून लवंगाच झाड येणे थोडं कठीण असतं. कारण सुकलेल्या बियांना अंकुर लवकर फुटत नाही. जर बियांना मातीत रोवत असाल तर पेरण्यापूर्वी २४ तास कोमट पाण्यात भिजवा. त्यानंतर एक ते दीड सेंटीमीटर खोलीवर रोवा आणि नंतर मातीने झाका. नर्सरीमधून रोप खरेदी करत असाल तर त्याची मुळे निरोगी आणि कोणत्याही कीटक आणि रोगांपासून मुक्त आहेत की, नाही हे देखील तपासा.
लवंगाचे झाड उष्ण असणाऱ्या ठिकाणी लवकर बहरते. त्यासाठी अशा ठिकाणी लावा की जिथे सूर्यप्रकाश आणि सावली दोन्ही मिळतील. खूप सूर्यप्रकाश असेल तर पाने जळतात आणि जास्त सावलीमुळे वाढ खुंटते. २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान लवंगाच्या रोपासाठी पुरेसे आहे. कुंडीतील माती ओलसर ठेवा पण त्यात सतत पाणी साचू देऊ नका. रोपाला जास्त पाणी दिल्यास मुळे कुजतात.
या रोपाला दोन ते तीन महिन्यानी खत किंवा कंपोस्ट घाला. यासाठी आपण संतुलित सेंद्रिय खताचा वापर करु शकतो. जेव्हा रोपाचे झाड होण्याची प्रक्रिया असेल तेव्हा फॉस्फरस आणि पोटॅशियमयुक्त खत चांगले राहिल. लवंगांना फुले येण्यासाठी साधारणत: चार ते दहा वर्षे लागू शकतात. हा काळ कुंडीतील मातीची काळजी आणि हवामानावर अवलंबून असतो.
Web Summary : Grow clove plants in pots! Use well-draining soil and provide sunlight. Water moderately and fertilize every 2-3 months. Patience is key; flowering takes years.
Web Summary : गमलों में लौंग के पौधे उगाएं! अच्छी जल निकासी वाली मिट्टी का प्रयोग करें और धूप प्रदान करें। मध्यम रूप से पानी दें और हर 2-3 महीने में खाद डालें। धैर्य रखें; फूल आने में वर्षों लगते हैं।