Join us  

जास्वंदाला पानं खूप-फुलंच नाही? किचनमधला हा पदार्थ कुंडीत घाला, जास्वंदांला फुलचं फुलं येतील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 4:19 PM

Best Methods To Grow Hibiscus : झाडाला वेळोवेळी खत  घालणं आवश्यक असते. केमिकल्सयुक्त खतांमुळे रोपांना फायदा होण्याऐवजी नुकसानच होते.  

गार्डनिंगचा छंद (Gardening Tips) असलेले लोक आपल्या गार्डनमध्ये वेगवेगळी रोपं लावणं पसंत करतात. यात जास्वंदाच्या फुलांचाही समावेश आहे. जास्वंदाचे फुल प्रत्येक घराच्या बागेत दिसून येते. अनेकदा पाण्याच्या कमतरतेमुळे जास्वंदाचे रोप सुकू लागते. (Best Methods To Grow Hibiscus) इतकंच नाही तर वेळेवर लक्ष दिले नाही तर हे रोप पूर्णपणे खराब होते. झाडाला वेळोवेळी खत  घालणं आवश्यक असते. केमिकल्सयुक्त खतांमुळे रोपांना फायदा होण्याऐवजी नुकसानच होते.  काही केमिकल्स विरहीत खतांच्या वापराने जास्वंदाच्या रोपाला  फुलं येण्यास मदत होईल. (How To Make More Hibiscdus Plants)

शेण खत

हे सहज उपलब्ध होणारे आणि पौष्टीक खत आहे. शेण खतात नायट्रोजन, फॉस्फरेस, पोटॅशियमचे संतुलन असते. जास्वंदाच्या फुलाच्या विकासासाठी हे आवश्यक असते. तुम्ही घरच्याघरी शेणखत बनवू शकता किंवा बाजारातून आणू शकता.

उन्हामुळे मनीप्लांट सुकतोय-पानं पिवळी पडली? ५ टिप्स; बहरेल मनीप्लांटची वेल

कडुलिंबाची काडी

कडुलिंबाच्या काड्या एक प्राकृतिक किटकनाशकांपैकी एक आहे. यात नायट्रोजन आणि कडुलिंबाचे तेल असते ज्यामुळे रोपांचा किटकांपासून बचाव होण्यास मदत होते. 

केळ्याचे साल

केळी खायला जितके गुणकारी असतात तितकेच त्यात पोटॅशियमचे प्रमाणही चांगले असते. ज्यामुळे फुलांची चांगली वाढ होते. केळ्याची सालं सुकवून याची पावडर बनवा आणि जास्वंद असलेल्या मातीत मिसळा. 

कोण सांगतं भातामुळे पोट सुटतं? तज्ज्ञ सांगतात भात खाण्याची योग्य पद्धत-गैरसमज होईल दूर

जास्वंदाच्या रोपाला खत कसे घालावे?

खताचा उपयो करण्यााआधी माती व्यवस्थित आहे की नाहे ते पाहा.  खताला रोपाच्या वरच्या बाजूने पसरवा. जास्त प्रमाणात खत घालू नका. अन्यथा मुळं जळू शकतात.  २ ते ३ महिने नियमित खत घालत राहा.

जास्वंदाच्या रोपाची काळजी कशी घ्याल

जास्वंदाच्या रोपाला व्यवस्थित पाणी घालणं गरजेचं असते. मातीला नियमित पाणी घाला. कोमेजलेली पानं काढून टाका. उन्हाळ्याच्या दिवसात जास्त ऊन्हाच्यावेळी रोपं बाहेर ठेवू नका. २ ते ३ तासांचे ऊन रोपांना पुरेसं होतं.  जास्वंदाचे रोप त्याच्या क्षमतेनमुसार  पाणी शोषून घेते. वारंवार जास्त पाणी घातल्याने फुलं येणं बंद होऊ शकते. कुंडीत  रोप लावल्यास ओलाव्यानुसार पाण्याचे प्रमाण नियंत्रित करावे लागते.  जर तुम्ही पाणी जास्त  घातले तर रोपाला पानंचं येतील. 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स