Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > गुलाबाच्या रोपाला पानं- फुलं कमी आणि नुसत्या काड्याच? घ्या उपाय- पालवी फुटून फुलंही येतील भरपूर

गुलाबाच्या रोपाला पानं- फुलं कमी आणि नुसत्या काड्याच? घ्या उपाय- पालवी फुटून फुलंही येतील भरपूर

Best Home Made Fertilizer For Rose Plant: गुलाबाच्या रोपाची पानं- फुलं कमी झाली असतील तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा...(home hacks for the blooming of rose plant)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2026 15:29 IST2026-04-02T15:27:55+5:302026-04-02T15:29:02+5:30

Best Home Made Fertilizer For Rose Plant: गुलाबाच्या रोपाची पानं- फुलं कमी झाली असतील तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा...(home hacks for the blooming of rose plant)

best home made fertilizer for rose plant, home hacks for the blooming of rose plant, home hacks for flowering rose plant  | गुलाबाच्या रोपाला पानं- फुलं कमी आणि नुसत्या काड्याच? घ्या उपाय- पालवी फुटून फुलंही येतील भरपूर

गुलाबाच्या रोपाला पानं- फुलं कमी आणि नुसत्या काड्याच? घ्या उपाय- पालवी फुटून फुलंही येतील भरपूर

Highlights १५ दिवसांतच गुलाबाला भरपूर नवी पानं फुटलेली दिसतील आणि कळ्या- फुलंही येतील. 

गुलाबाचं रोप आपण हौशीने आपल्या बाल्कनीमध्ये, टेरेसमध्ये किंवा अंगणात लावतो. कारण त्याला आलेली टपोरी फुलं पाहूनच मन खुश होऊन जातं. पण बऱ्याचदा असाही अनुभव येतो की काही केल्या गुलाबाला फुलंच येत नाहीत. अगदी एखादं फुलं कधीतरी येतं. शिवाय रोपालाही काड्याच जास्त असतात. पानांची संख्या कमी होते आणि त्यांचा आकारही लहान होतो. याचाच अर्थ की त्या रोपाला पुरेसं पोषण मिळत नाहीये. अशावेळी त्या गुलाबाच्या रोपाला विकतचं कोणतंही खत घालण्यापेक्षा स्वयंपाक घरातले दोन पदार्थ वापरून एक छान घरगुती टॉनिक तयार करा आणि तेच ८ दिवसांतून एकदा त्याला द्या (home hacks for the blooming of rose plant). ते टॉनिक कसं तयार करायचं ते पाहुया..(Best Home Made Fertilizer For Rose Plant)

गुलाबाच्या रोपाला नवी पालवी फुटून भरपूर फुलं येण्यासाठी उपाय

 

गुलाबासाठी उत्तम घरगुती खत तयार करायचं असेल तर त्याचं सगळं सामान तुमच्या घरातच तुम्हाला अगदी सहज मिळून जाईल. शिवाय त्यासाठी खूप वेगळी मेहनत घेण्याचीही गरज नाही. त्यासाठी सगळ्यात आधी तर २ केळी घ्या आणि त्याचे तुकडे करून एका भांड्यात ठेवा.

चैत्र गौर: हळदी कुंकवासाठी कैरीच्या डाळीची चटपटीत रेसिपी, चव अशी की सगळ्याजणी पुन्हा- पुन्हा खातील..

केळी चांगलीच हवी. सडकी किंवा खराब झालेली केळी खत तयार करण्यासाठी वापरू नये. कारण त्यामुळे रोपाला इन्फेक्शन होऊन त्यावर रोग पडू शकताे.

आता १ टेबलस्पून गूळ घेऊन तो बारीक किसा आणि केळीमध्ये घाला. केळी आणि गूळ व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या.

 

आता या भांड्यावर झाकण ठेवा आणि तो जवळपास १० ते १२ दिवस तसाच राहू द्या. त्यानंतर हे मिश्रण चांगलं फर्मेंट होईल आणि त्यातूनच रोपासाठी चांगलं खत तयार होईल.

पंचविशीतल्या प्रत्येक तरुणीला माहिती हव्या ५ गोष्टी.. नेहमी दिसाल तरुण आणि फिटनेस जबरदस्त

१०- १२ दिवसांनी तयार झालेलं मिश्रण पुन्हा एकदा हलवून घ्या. आता २० मिली एवढं जर हे मिश्रण घेतलं तर त्यामध्ये १ लीटर पाणी घाला आणि हे पाणी रोपांना द्या. आठवड्यातून एकदा जर हा उपाय केला तर अगदी १५ दिवसांतच गुलाबाला भरपूर नवी पानं फुटलेली दिसतील आणि कळ्या- फुलंही येतील. 

 

Web Title : गुलाब के पौधे में अधिक फूल पाने के लिए: घर का बना टॉनिक।

Web Summary : गुलाब के पौधे में फूल नहीं आ रहे? केले और गुड़ का घरेलू टॉनिक इस्तेमाल करें। 10-12 दिनों तक किण्वन करें, पतला करें और भरपूर फूलों और पत्तियों के लिए साप्ताहिक रूप से लगाएं।

Web Title : Get more rose flowers: Homemade tonic for rose plant blooming.

Web Summary : Rose plants lacking flowers? Use a homemade tonic of banana and jaggery. Ferment for 10-12 days, dilute, and apply weekly for abundant blooms and foliage.