Join us

जास्वंदाच्या रोपाला १५ दिवसांतून एकदा द्या बटाट्याचं खास खत! रोपं वाढतील जोमानं, फुलंही येतील भरपूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2025 09:25 IST

Best Fertilizer for Hibiscus or Jaswand Plant: जास्वंदाचं रोप नुसतंच वाढत असेल, त्याला अजिबात फुलं येत नसतील तर हा एक सोपा उपाय घरच्याघरी करून पाहा.(how to use batata for jaswand plant?)

काही फुलझाडं अशी असतात जी आपण अगदी हौशीने आपल्या बाल्कनीमध्ये किंवा अंगणात लावतो. त्यापैकीच एक आहे जास्वंद. जास्वंदाचं फूल दिसायलाही छान असतं आणि शिवाय देवाला वाहण्यासाठीही त्याचा उपयोग होतोच. त्यामुळे अगदी वेगवेगळ्या रंगाची जास्वंदाची रोपं आपण हौशीने आणतो. पण नेमकं असं होतं की ते रोप घरी आणल्यानंतर ते नुसतंच वाढतं. त्याला फुलंच येत नाहीत. असं जर तुमच्याही रोपाच्या बाबतीत झालं असेल तर १ बटाटा घ्या आणि तो पुढे सांगितलेल्या पद्धतीने जास्वंदाच्या रोपाला खत म्हणून द्या (how to use batata for jaswand plant?). बघा अगदी महिना भरातच तुमच्या जास्वंदाच्या रोपाला भरपूर कळ्या लागलेल्या दिसतील.(Best Fertilizer for Hibiscus or Jaswand Plant)

जास्वंदाच्या रोपाला भरपूर फुलं येण्यासाठी उपाय

 

हा उपाय करण्यासाठी आपल्याला बटाटा खूप उपयोगी ठरणार आहे. एक मध्यम आकाराचा बटाटा घ्या. त्याचे बारीक काप करा. हे काप मिक्सरच्या भांड्यात घाला आणि त्यामध्ये थोडं पाणी मिसळा. यानंतर बटाट्याची मिक्सरमधून अगदी बारीक प्युरी करून घ्या. ती प्युरी गाळून घ्या आणि नंतर ती अर्धा ते पाऊण लीटर पाण्यात मिसळा. आता हे पाणी १५ दिवसांतून एकदा जास्वंदाच्या रोपाला द्या. अगदी काही दिवसांतच तुम्हाला जास्वंदाच्या रोपामध्ये खूप चांगला फरक दिसून येईल.

 

हा उपायही करून पाहा

जास्वंदाच्या रोपाला भरपूर फुलं येण्यासाठी केळीची सालंही खूप उपयुक्त ठरतात. कारण केळीच्या सालांमध्ये असणारं पोटॅशियम फुलझाडांसाठी अतिशय उत्तम खत असतं. केळीच्या सालीचे बारीक तुकडे करा आणि ते तुकडे जास्वंदाच्या कुंडीमधल्या मातीमध्ये मिसळून खोचून द्या. जसं जसं तुम्ही रोपाला पाणी द्याल तसं तसं हळूहळू केळीमधलं पोटॅशियम रोपाला मिळत जाईल. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सफुलंखतेइनडोअर प्लाण्ट्सबटाटाकेळी