गावाकडे ज्यांची शेती आहे, ते लोक ताजी भाजी शेतातून तोडून आणतात . ती ताजी भाजी अगदी नैसर्गिक रसायन विरहीत असते. चवीला जास्त छान लागतेच, पण पौष्टिकही फार असते. आपण शहरात बाजारातून भाजी विकत आणून खातो. पण आता लोकं 'होम गार्डनिंग' किंवा 'टेरेस गार्डनिंग' वगैरे करतात.(6 Vegetables Grow Well Even In Small Pots, Eat Fresh Veggies) सगळ्यांनाच ते परवडते असे नाही. काहींच्या घराला टेरेस नसते. घरात रोप लावण्या एवढी जागा नसते. आणि लहान झाडे नर्सरीतून विकत घेणं सर्वांनाच परवडत असं नाही.
पण नर्सरीतून रोप आणण्यापेक्षा, जर घरी आणलेल्या भाज्यांपासून त्या भाजीचे पिक घेता आले तर? जाणून घ्या अशी कोणती रोप आहेत. जी कोणीही घरी पिकवू शकते. फार कष्ट नाहीत आणि अति काळजी घ्यावी लागत नाही.(6 Vegetables Grow Well Even In Small Pots, Eat Fresh Veggies)
१.पुदिना
पुदिन्याच्या काड्यांच्या खालच्या टोकाचा भाग कापून घ्या. एका काचेच्या बरणीत पाणी घ्या. आता त्या पाण्यात काडीचा कापलेला भाग ठेवा. त्याला मुळे फुटायला लागली की बाटलीतून काढून कुंडीत लावा.
२.कोथिंबीर(6 Vegetables Grow Well Even In Small Pots, Eat Fresh Veggies)
कोथिंबिरीच्या काड्या आपण फेकून देतो. त्या काड्या आता फेकू नका. कोथिंबीरीच्या काड्यांना मुळं असतातच. त्या काड्या तशाच मातीत पेरा. अर्ध्याहून अधिक काडी मातीत रुतेल याची काळजी घ्या. पाणी घालत राहा.
३.पालक
पालकाच्या काड्या स्वच्छ धुवून घ्या. त्यांचा वरचा भाग कमी करा. पण मुळाच्या टोकाला कात्री लावू नका. काड्या मातीत व्यवस्थित रुतवून घ्या. नियमित पाणी घाला.
४.कांदा
अनेकदा घरात पडून असलेल्या कांद्याला मोड येतात. हा मोड आलेला कांदा आपण फेकून देतो. पण जर तो आख्खा कांदा तुम्ही मातीत रुजवूा आणि त्याला नीट पाणी देत राहीलात. तर घरच्या घरी छन कांद्याचे पिक घेता येतो.
५.बीटाची पाने
बीटाचा वरचा भाग लहान मुळासारखा असतो. हा भाग आपण कापून फेकतो. तो भाग जर मातीत पेरलात, तर त्याला नविन पाने फुटतात. ही पाने फार चविष्ट आणि पौष्टिक असतात.
६. मुळा
मुळ्याच्याही वरच्या भागपासून पिक घेता येते. त्याला नविन पाने फुटतात. या पानांची भाजी तयार करता येते.