Join us

तुळस कडक उन्हात वाळते? पानं पिवळी पडतात? १ ट्रिक-भर उन्हातही तुळस डवरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2024 13:21 IST

5 tips to maintain Tulsi (Basil) plant in summers : भर उन्हात अंगणी असलेल्या तुळशीची कशी काळजी घ्याल?

गेल्या काही दिवसापासून कडक उन्हामुळे प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे. अचानक लोक स्वेटरवरून हाफ टी-शर्टकडे वळले आहे. शरीराला गारवा देण्यासाठी लोक थंड पेय किंवा गारव्यात राहतात (Gardening Tips). मनुष्य उन्हापासून स्वतः रक्षण करतो. पण झाडांचं काय? झाडांना देखील उन्हाचा त्रास होतो (Tulsi). उन्हाळ्यात झाडांची विशेष काळजी घ्यायला हवी. विशेषतः तुळशीच्या रोपाची काळजी घेणं गरजेचं आहे.

उन्ह वाढलं की, तुळशीचे रोप सुकते. शिवाय पाणी वेळेवर मिळत नसल्यामुळे तुळशीची पानं काळी पडतात. सूर्यप्रकाशापासून तुळशीची काळजी घ्यायची असेल तर, काय करावे? उन्हाळ्यात तुळस सुकू नये म्हणून कशी काळजी घ्यावी? पाहूयात(5 tips to maintain Tulsi plant in summers).

तुळशीच्या रोपाला स्कार्फ किंवा कापडाच्या मदतीने कव्हर करा

- सूर्यप्रकाशाशिवाय झाडे चांगली फुलू शकत नाहीत. परंतु, जर सूर्यप्रकाश जास्त असेल तर, तुळशीच्या रोपट्याला कव्हर करणं गरजेचं आहे.

- कडक सूर्यप्रकाशामुळे तुळशीची पानं काळी पडतात, किंवा रोपटे सुकून जाते. त्यामुळे रोपट्यावर कापड बांधा.

लिंबाचे झाड वाढतच नाही? कुंडीतल्या मातीत मिसळा एक फुकट मिळणारी गोष्ट; रसाळ लिंबू हवेत तर..

- यासाठी तुळशीच्या रोपट्याभोवती दोन उंच काडी मातीत रोवा.  या काड्यांवर सुती कापड ठेवा, आणि रोपट्याला कव्हर करा.

- त्यामुळे तुळशीच्या झाडावर थेट सूर्यप्रकाश पडणार नाही आणि उन्हाचा त्रास रोपट्याला होणार नाही.

कडक उन्हापासून रक्षण करा

तुळशीला चार ते पाच तास सूर्यप्रकाश लागते. त्यामुळे झाडाची वाढ चांगली होते. परंतु कडक सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी रोपटे ठेऊ नका. यामुळे झाडांची मुळे कमकुवत होऊ शकतात. उन्हाळ्यात सकाळी ८ नंतर कडक उन्ह लागते. त्यामुळे रोपटे सावलीत ठेवा.

तुळस काळी पडते, लगेच वाळते? चमचाभर मिठाचा सोपा उपाय; तुळशीजवळ कीटक फिरकणारही नाही

पाणी वेळेवर घालायला विसरू नका

उन्हाळ्यातही तुळस हिरवीगार ठेवायची असेल तर, जमिनीत ओलावा ठेवा. सूर्यप्रकाशामुळे मातीमधील पाणी आटते. ज्यामुळे तुळशीचे रोप कोमेजून जाते. म्हणून उन्हाळ्यात रोपाच्या मातीची काळजी घ्या, पाणी वेळेवर घालायला विसरू नका.

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल व्हायरल