Join us  

विकतचे फ्रोझन मटार कशाला? 2 पध्दतीने साठवता येतात  ताजे मटार, वर्षभर खा मटार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 8:33 PM

ताजे मटार फक्त हिवाळ्यात मिळतात. एरवी मटारची गरज फ्रोझन मटारवर भागवावी लागते. पण फ्रोझन मटार नेहमीच्या आहारात वापरणं त्रासदायक मानलं जातं. बाहेरुन फ्रोझन मटार आणण्यापेक्षा घरच्याघरी वर्षभर मटारचे दाणे साठवण्याची सोय करता येते. त्यासाठी 2 सोप्या पध्दती आहेत.

ठळक मुद्देघरच्याघरी प्रक्रिया करुन मटार साठवण्याच्या एका पध्दतीत मोहरीच्या तेलाचीही आवश्यकता असते. दुसऱ्या पध्दतीने मटार उकळून नंतर कोरडे करुन साठवता येतात.घरच्याघरी साठवलेले हिरवे मटार हे फ्रोझन मटारच्या तुलनेत आरोग्यासाठी सुरक्षित असतात.   

ताजे मटारचे दाणे घालून काहीही करा, नेहमी स्पेशलच होतं. मग हिरव्या मटारची उसळ असू देत की हिरवे मटार घालून केलेली साधी खिचडी. मटार घालून केलेला उपमा असू देत की मटार पराठा. आपल्याला जरी  वर्षभर मटार लागत असले तरी ताजे मटार फक्त हिवाळ्यात मिळतात. एरवी मटारची गरज फ्रोझन मटारवर भागवावी लागते. पण फ्रोझन मटार नेहमीच्या आहारात वापरणं त्रासदायक मानलं जातं. बाहेरुन फ्रोझन मटार आणण्यापेक्षा घरच्या घरी वर्षभर मटारचे दाणे साठवण्याची सोय करता  येते. त्यासाठी 2 सोप्या पध्दती आहेत. 

Image: Google

वर्षभर ताजे मटार घरच्याघरी

1. ताजे मटार दोन पध्दतीने घरच्या घरी साठवता येतात. पहिली पध्दत ही विना उकळून मटार साठवण्याची आहे. या पध्दतीत आपल्याला जितके मटार दाणे साठवायचे आहेत तेवढ्या शेंगा आणाव्यात. वर्षबर मटार दाणे साठवण्यासाठी पेन्सिल मटार शेंगा आणाव्यात. यातील दाणे चवीला गोड असतात आणि जास्त कडकही नसतात. बारीक दाणे घेऊ नये. एक किलो मटार दाणे असतील तर एक छोटा चमचा मोहरीचं तेल घ्यावं. तेल सर्व मटार दाण्यांना नीट लावावं. मोहरीचं तेल लावल्यानं फ्रिजरमधे ठेवलेल्या मटार दाण्यावर बर्फ साठत नाही.  मोहरीचं तेल लावलेले दाणे प्लास्टिकच्या पिशवीत घालून आणि पिशवीचं तोंड रबर लावून बंद करावं. ही पिशवी फ्रिजरमध्ये ठेवून द्यावी. 

Image: Google

2. घरी वर्षभर मटारचे ताजे दाणे साठवण्याची दुसरी पध्दत दाणे उकळून घेण्याची आहे. यात आपल्याला जेवढे मटार दाणे साठवायचे आहेत तेवढ्या शेंगा घ्याव्यात.  साठवण्यासाठी मोठे दाणे घ्यावेत. निवडलेले मटारचे दाणे पाण्याने दोनदा धुवावेत. नंतर एक मोठं भांडं घेऊन त्यात पाण गरम करयला ठेवावं. पाण्याला उकळी आली की त्यात मटार दाणे घालावेत. पाण्यात दाणे 2 मिनिटं उकळावेत. नंतर गॅस बंद करावा. मटारचे दाणे एका चाळणीत काढून घ्यावेत. मग एका भांड्यात साधं पाणी किंवा गार पाणी घ्यावं. त्यात बर्फाचे तुकडे घालावेत. त्या पाण्यात गरम पाण्यातून काढलेले मटार दाणे घालावेत. मटारचे दाणे पूर्ण थंड झाले की पुन्हा ते पाण्यातून निथळून घ्यावेत. एक मोठ्या कापडावर हे दाणे पसरुन घालावेत. दाण्यातील पाणी पूर्ण सुकलं की एका प्लास्टिकच्या पिशवीत हे दाणे ठेवावेत. पिशवीचं तोंड रबर लावून बंद करावं आणि ही पिशवी फ्रिजरमधे ठेवून द्यावी.. अशा पध्दतीने घरच्याघरी प्रक्रिया केलेले मटारचे दाणे वर्षभर चांगले राहातात. 

टॅग्स :अन्नकिचन टिप्स