ऋतूमानानुसार आहारात बदल करणं महत्त्वाचं असतं. हिवाळ्यात जे पदार्थ शरीराला ऊर्जा देतात, तेच पदार्थ उन्हाळ्यात उष्णता वाढवण्यास कारणीभूत ठरु शकतात. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या आणि पचायला हलक्या असणाऱ्या पदार्थांची गरज असते. (Healthy roti options for heat relief) अनेकदा आपण मल्टीग्रेन किंवा नाचणीची भाकरी आरोग्यासाठी उत्तम मानतो पण उन्हात याचा आपल्याला त्रास होतो. (Wheat chapati benefits in summer)
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे आणि पित्तशमन करणं महत्त्वाचे असते. यामुळे या दिवसात कोणत्या पिठाची चपाती किंवा भाकरी खाल्ल्याने पोटाला गारवा मिळेल. (Ayurvedic diet for summer season) अपचन, गॅसेसचा त्रास टाळण्यासाठी काय खायला हवं. ऋतूनुसार आपल्या ताटात कोणती भाकरी असणे 'बेस्ट' आहे.
उन्हाळ्यात काय खावे आणि काय टाळावे?
1. ज्वारीची भाकरी थंड असते. उन्हाळ्यात ज्वारीची भाकरी खाणे सर्वोत्तम मानलं जातं. कारण ही पचायला हलकी असते आणि शरीरातील उष्णता शोषून घेते.
2. गव्हाची चपाती मऊ असल्यामुळे ही रोज खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. पण पीठ दळताना यात थोडेसे जवस घातल्यास गुणधर्म अधिक वाढतात. तसेच गव्हाची चपाती पचायला हलकी असते.
3. जवसमध्ये ओमेगा-३ युक्त घटक असतात आणि ते पचनासाठी उत्तम असतात. गव्हाच्या पिठात याचे प्रमाण संतुलित ठेवल्यास उन्हाळ्यात पोटाला त्रास होत नाही.
हे पदार्थ उन्हाळ्यात खाऊ नका...
1. बाजरी आणि मका दोन्ही धान्य उष्ण प्रकृतीचे आहेत. हिवाळ्यात ते खाण्यासाठी फायदेशीर ठरतात तर उन्हाळ्यात खाल्ल्याने शरीरातील पित्त वाढते किंवा अपचनाचा त्रास होतो.
2. नाचणी ही कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असली तरी पचायला जड आणि उष्ण असते. यामुळे उन्हाळ्यात नाचणीची भाकरी खाणे टाळा.
3. मल्टीग्रेन पीठात अनेक प्रकारचे कडधान्यांचे मिश्रण असते. जे उन्हाळ्यात पचायला कठीण जाते. यामुळे गॅस किंवा पोट फुगण्याच्या तक्रारी वाढतात.
4. मैद्याची चपाती किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ कमी प्रमाणात खायला हवे. मैदा आतड्यांना चिकटतो आणि उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास वाढवतो.
Web Summary : Choose cooling foods like jowar bhakri in summer. Wheat with flaxseed is good. Avoid bajra, ragi, multigrain, and maida to prevent digestive issues and heat.
Web Summary : गर्मी में ज्वार की भाकरी जैसे ठंडे खाद्य पदार्थ चुनें। अलसी के साथ गेहूं अच्छा है। बाजरा, रागी, मल्टीग्रेन और मैदा से बचें ताकि पाचन संबंधी समस्याएँ और गर्मी न हों।