Join us  

दिवाळीचा उरलेला फराळ वापरून करा ३ खमंग- खरपूस पदार्थ! लगेचच फस्त होईल सगळा फराळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2023 3:53 PM

Cooking Tips For Leftover Diwali Faral: दिवाळीच्या उरलेल्या फराळाचं काय करावं असा प्रश्न पडला असेल तर हा घ्या एक मस्त खमंग उपाय....

ठळक मुद्देदिवाळीनंतर उरलेल्या फराळापासून हे काही खमंग पदार्थ करता येतील. पदार्थांची चव एवढी छान असेल की बघता बघता सगळे पदार्थ फस्त होतील.

दिवाळीत आपण आपल्या घरासाठी भरपूर फराळाचे पदार्थ करतो किंवा मग विकत आणतो. त्यानंतर नातलग, मित्रमंडळी, शेजारी यांच्याकडूनही फराळाचे पदार्थ आपल्या घरात येतात. पाहता पाहता सगळा मिळून एवढा फराळ होऊन जातो की मग दिवाळी झाल्यानंतर तो खाण्याचाही कंटाळा येतो. उरलेल्या फराळाचे करायचे काय (What to do with leftover diwali faral?), हा प्रश्न या दिवसांत जवळपास सगळ्याच महिलांना पडलेला असतो. त्यासाठीच हे बघा त्या प्रश्नाचं एक खमंग उत्तर. दिवाळीनंतर उरलेल्या फराळापासून हे काही खमंग पदार्थ करता येतील. पदार्थांची चव एवढी छान असेल की बघता बघता सगळे पदार्थ फस्त होतील. (Best reuse of lefover chivda, shev and laddoo after diwali)

दिवाळीच्या उरलेल्या फराळापासून कोणते पदार्थ करायचे?

 

१. थालिपीठ

घरात चिवडा, शेव, चकल्या उरल्या असतील तर त्या सगळ्या एकत्र करा. शेव कुस्करून घ्या आणि चकलीचे बारीक तुकडे करून घ्या. सगळे पदार्थ एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्या.

'या' २ गोष्टींमुळे कुंडीतल्या झाडांची पानं पिवळी पडतात, फुलं येत नाहीत! बघा नेमकं काय चुकतं..

आता या पीठामध्ये थोडी कणिक घाला. कांदा, टोमॅटो, आलं- लसूण पेस्ट आणि तुमच्या आवडीची मेथी, कोबी, पालक, भोपळा अशी कोणतीही भाजी त्यात किसून टाका. दही किंवा ताक टाकून हे पीठ भिजवा आणि त्याचे छान खमंग खरपूस थालिपीठ करा. 

 

२. गोड पोळ्या

लाडू, करंजी, शंकरपाळे असे पदार्थ उरले असतील तर ते देखील मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घ्या.

केसांत खूपच कोंडा झाला- डोक्यात सतत खाज येते? केस धुण्याच्या आधी फक्त १ काम करा- कोंडा कमी होईल

त्या पावडरचा लाडूसारखा गोळा करता येतो का ते पाहा. नसेल होत तर त्याला थोडा तुपाचा हात लावा. आता कणिक भिजवून घ्या. त्या कणकेत आपण पुरणाच्या पोळीत सारण भरतो तसे हे लाडवांचे गोड सारण भरा आणि पोळी लाटून घ्या. तव्यावर भाजताना थोडं पोळीच्या दोन्ही बाजूला तूप लावा. चवदार गोड पोळी तयार.

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.दिवाळी 2023