Lokmat Sakhi >Food > शी बाई केवढं उकडतंय! आता साधं गार पाणी नको, ‘हे’ पाणी प्या! गारेगार फ्रेश वाटेल

शी बाई केवढं उकडतंय! आता साधं गार पाणी नको, ‘हे’ पाणी प्या! गारेगार फ्रेश वाटेल

vetiver for summer, just put it in drinking water and see the magic : उन्हाळ्यापासून वाचवेल हा एक गवताचा प्रकार. वासही अगदी छान असतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 14:36 IST2025-03-04T14:35:51+5:302025-03-04T14:36:59+5:30

vetiver for summer, just put it in drinking water and see the magic : उन्हाळ्यापासून वाचवेल हा एक गवताचा प्रकार. वासही अगदी छान असतो.

vetiver for summer, just put it in drinking water and see the magic | शी बाई केवढं उकडतंय! आता साधं गार पाणी नको, ‘हे’ पाणी प्या! गारेगार फ्रेश वाटेल

शी बाई केवढं उकडतंय! आता साधं गार पाणी नको, ‘हे’ पाणी प्या! गारेगार फ्रेश वाटेल

उन्हाळ्याचा त्रास यंदा फेब्रुवारीमध्येच सुरू झाला आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, यंदा कधीच पडले नसेल एवढे ऊन पडण्याची शक्यता आहे. (vetiver for summer, just put it in drinking water and see the magic)म्हणजेच उकाडा असह्य होणार आहे. हा उकाडा आपण कमीही करू शकत नाही किंवा स्कीपही करू शकत नाही. आपण एकच करू शकतो ते म्हणजे योग्य ती काळजी घेणे. उन्हाळा जीवावर बेतू शकतो. (vetiver for summer, just put it in drinking water and see the magic)त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. शरीर अत्यंत घामाघूम होते. त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. चक्कर येणं, घशाला कोरड पडणं, दम लागणं हे आपल्याला शुल्लक त्रास वाटतात. पण तसे नसून त्याचा फार त्रास होऊ शकतो. 

लिंबू पाणी, नारळ पाणी, विविध सरबत आपण पितोच. फळांचे रस काढून पितो. कारण शरीराला नेहमीपेक्षा जास्त पाण्याची गरज असते. पण तुम्हाला माहिती आहे का? एक असा पदार्थ आहे, जो फक्त माठातील पाण्यात घालायचा आहे. (vetiver for summer, just put it in drinking water and see the magic)असे केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. शिवाय पाण्यालाही छान वास येतो. रस काढायचे कष्टही नाहीत, साधं पाणीच. पण जास्त फायदेशीर. तो पदार्थ म्हणजे वाळा. वाळ्याच्या काड्या बाजारात मिळतात. उन्हाळा आल्यावर तर जागोजागी मिळायला सुरवात झाली आहे.

वाळ्याची गंडी व्यवस्थित बांधून माठाच्या पाण्यात ठेवायची. त्याचे गुणधर्म पाण्यात उतरतात. काही दिवसांनी ती गंडी काढून दुसरी ठेवायची. 
वाळा हा गवताचाच प्रकार आहे. त्याच्या मुळांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. वेबदुनिया, मराठी विश्वकोष, अॅग्रोवोन आदी अनेक पानांवर वाळ्याची माहिती उपलब्ध आहे. 

उन्हाळ्यात उद्भवणारे सर्व आजार वाळ्यामुळे शरीरापासून दूर ठेवता येतात. वाळा अत्यंत थंड असतो. 
शरीराला गरजेचा असलेला थंडावा वाळ्यापासून मिळतो. त्वचेसाठी वाळा अत्यंत चांगला. 
सन स्ट्रोक तसेच चक्कर असे त्रास उन्हाळ्यात होतात. ते ही टाळता येतात. 
उन्हाळ्यात पित्ताचे प्रमाण वाढते. त्यामुळे उलट्या होतात. चक्कर येते. घसा खरवडला जातो. वाळा त्यावरही गुणकारी.
घामाला येणारा वासही वाळ्याच्या पाण्यामुळे कमी करता येतो. मात्र सतत ३ ते ४ महिने प्यायला हवे. 

मग आता जास्त विचार करू नका. बाजारातून वाळा विकत आणा. अत्यंत स्वस्तही असतो. वापरायला तर अगदीच सोपा. पण त्याचे शरीरासाठी फायदे भरपूर आहेत. उन्हाळ्यात नैसर्गिकरित्या थंडावा देणार्‍या पदार्थांचा वापर करा. बर्फाचा नको.      
 

Web Title: vetiver for summer, just put it in drinking water and see the magic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.