Lokmat Sakhi >Food > Monsoon Food : भाजी-चपाती खाऊन कंटाळलात? करा चमचमीत व्हेज पुदिना पुलाव, पावसाळ्यात खा हलका- पौष्टिक आहार

Monsoon Food : भाजी-चपाती खाऊन कंटाळलात? करा चमचमीत व्हेज पुदिना पुलाव, पावसाळ्यात खा हलका- पौष्टिक आहार

mint rice recipe vegetarian: easy monsoon meal ideas: one pot mint rice recipe: पुलाव कसा बनवायचा यासाठी लागणारे साहित्य कोणते जाणून घेऊया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2025 16:55 IST2025-06-27T09:30:00+5:302025-06-30T16:55:41+5:30

mint rice recipe vegetarian: easy monsoon meal ideas: one pot mint rice recipe: पुलाव कसा बनवायचा यासाठी लागणारे साहित्य कोणते जाणून घेऊया.

veg pudina pulao recipe healthy pulao for rainy season light dinner ideas Indian | Monsoon Food : भाजी-चपाती खाऊन कंटाळलात? करा चमचमीत व्हेज पुदिना पुलाव, पावसाळ्यात खा हलका- पौष्टिक आहार

Monsoon Food : भाजी-चपाती खाऊन कंटाळलात? करा चमचमीत व्हेज पुदिना पुलाव, पावसाळ्यात खा हलका- पौष्टिक आहार

रोज काय बनवावं असा प्रश्न आपल्याला पडतो. घरातल्या माणसांना देखील नेहमीच नवनवीन पदार्थ खाण्याची इच्छा होत असते.(Veg Pulao recipe) रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात त्यांना हलका आहार वरण- भात किंवा डाळ खिचडी सारखे पदार्थ हवे असतात. अशावेळी व्हेज पुलाव हा पर्याय चांगला ठरेल.(One Pot meal) मुलांच्या शाळा सुरु झाल्या असून त्यांना रोज चपाती-भाजी घेऊन जाण्याचा देखील वैताग येतो अशावेळी व्हेज पुलाव हा पर्याय त्यांच्यासाठी चांगला असेल. (mint rice recipe vegetarian)
व्हेज पुलाव बनवण्यासाठी आपण आपल्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकतो.(quick pulao for lunch) पावसाळा सुरु झाला असून या काळात आपल्याला हलका आणि पौष्टिक आहार खाण्याचा सल्ला दिला जातो.(easy monsoon meal ideas) व्हेज पुलावमध्ये विविध भाज्या घालून त्याची चव वाढवली जाते. त्यामुळे यातून आपल्याला भरपूर पोषण देखील मिळते. हा पुलाव कसा बनवायचा यासाठी लागणारे साहित्य कोणते जाणून घेऊया. 

मराठवाडा स्पेशल पारंपरिक रेसिपी! झणझणीत आदनवड्या, मऊ लुसलुशीत पदार्थ-डब्यासाठी खास पर्याय

साहित्य 

आले - १ तुकडा 
लसूण पाकळ्या - ३
हिरवी मिरची - ५
पुदिन्याची पाने - २ कप 
कोथिंबीर - २ कप 
किसलेले खोबरे - १/४ कप 
पाणी
तूप - ३ चमचे 
खडा मसाला
उभा चिरलेला कांदा - १ कप 
उभा चिरलेला टोमॅटो - १ कप 
मीठ - २ चमचे 
गरम मसाला - १ चमचा 
धुतलेला लांब तांदूळ 
तळलेले काजू 

कृती 

1. सगळ्यात आधी बासमती तांदूळ धुवून बाजूला काढून ठेवा. आता मिक्सरच्या भांड्यात आले, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, १ कप पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर, किसलेले खोबरे आणि पाणी घालून मसाला तयार करा. 

2. आता कुकरमध्ये तूप गरम करुन त्यात तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी, स्टार फ्रुट, हिरवी वेलची असा खडा मसाला घालून चांगले परतवून घ्या. त्यानंतर उभा चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतवा. त्यात टोमॅटो घालून पुन्हा एकदा परतवा. आता त्यात तयार केलेला मसाला घालून २ ते ३ मिनिटे शिजवून घ्या. 

3. यामध्ये गरम मसाला आणि मीठ घालून चांगले परतवून घ्या पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर घाला चांगले एकजीव करुन घ्या. त्यात धुतलेला बासमती तांदूळ घालून पुन्हा एकजीव करा. आता त्यात पाणी घालून कुकरच्या शिट्ट्या होऊ द्या. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून त्यावर     तळलेले काजू पसरवा. तयार होईल गरमागरम पुदिना व्हेज पुलाव. हवे असल्यास आपण यात भाज्या घालू शकतो. 

 

Web Title: veg pudina pulao recipe healthy pulao for rainy season light dinner ideas Indian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.