आपल्या रोजच्या जेवणातील काही पदार्थ हे काहीवेळा शिल्लक राहतात. शक्यतो, कित्येकदा डाळ आणि चपात्या या शिल्लक राहतात. बहुतेक वेळा या उरलेल्या पदार्थांचं (Leftover Roti & Daal Dosa Recipe) पुढे काय करावं, हेच समजत नाही. उरलेले जास्तीचे पदार्थ फेकून द्यायचे म्हटलं तरी अन्न वाया गेल्याच दुःख होतच. अन्न वाया घालवणं हे चुकीचं आहे आणि आर्थिकदृष्ट्याही नुकसानकारक ठरू शकतं. अशा परिस्थितीत, शिल्लक राहिलेल्या ( Trying out this viral Dosa hack with leftover Roti & Daal) अन्नाचा चविष्ट आणि पौष्टिक असा नवीन पदार्थ तयार करून तो चवीने खाणे हेच शहाणपणाचं ठरतं. उरलेले अन्नपदार्थ वाया न घालवता, थोडी कल्पकता वापरली, तर हाच उरलेला पदार्थ एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थात रूपांतरित होऊ शकतो(How To Make Dosa From Leftover Roti & Daal).
शिल्लक राहिलेल्या चपात्या आणि डाळीचे बॅटर तयार करून आपण त्याचा डोसा तयार करू शकतो. झटपट तयार होणारा, पचनास हलका आणि चविष्टही! डाळीतील प्रथिने आणि चपातीतील फायबर्स यामुळे हा डोसा फक्त चवीलाच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. याचबरोबर, अन्नाचा योग्य उपयोग केल्याचं समाधानही मिळतं. या डोशात, चपाती आणि डाळ दोन्ही पदार्थांचे पौष्टिक गुण टिकून राहतात, शिवाय तो तयार करायला फारसा वेळही लागत नाही. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या - फुलक्या खाण्यासाठी हा एक बेस्ट पदार्थ ठरु शकतो. शिल्लक राहिलेल्या चपात्या आणि डाळीचा डोसा कसा करायचा याची सोपी रेसिपी पाहूयात..
साहित्य :-
१. शिल्लक राहिलेल्या चपात्या - ४ ते ५ चपात्या २. शिल्लक राहिलेली डाळ - १ बाऊल ३. बेसन - २ टेबलस्पून ४. आलं - लसूण पेस्ट - १/४ टेबलस्पून ५. कांदा - १ कप (बारीक चिरलेला) ६. टोमॅटो - १ कप (बारीक चिरलेला)७. हिरव्या मिरच्या - २ ते ३८. कोथिंबीर - ३ ते ४ टेबलस्पून ९. हळद - चिमूटभर १०. खायचा सोडा - चिमूटभर ११. पाणी - गरजेनुसार १२. तेल - गरजेनुसार
बेसन नको, फक्त १५ मिनिटांत करा डाळ तांदुळाचा लुसलुशीत ढोकळा - चवीला उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक...
भाकरी उरली, कडक झाली? मग पटकन १० मिनिटांत करा, मस्त झणझणीत - चटपटीत भाकरीचा चिवडा...
कृती :-
१. सगळ्यात आधी शिल्लक राहिलेल्या चपातीचे छोटे - छोटे तुकडे करून घ्यावेत. आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात चपातीचे तुकडे घालून ते हलकेच फिरवून घ्यावेत. मग त्यात शिल्लक राहिलेली डाळ आणि बेसन घालावे. आता सगळे जिन्नस एकत्रित मिक्सरमध्ये वाटून घ्यावेत. सगळ्यात शेवटी या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून डोशासारखे बॅटर तयार करून घ्यावे.
२. मिक्सरमधील तयार बॅटर एका मोठ्या बाऊलमध्ये काढून त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या घालाव्यात. ३. त्यानंतर या मिश्रणात चवीनुसार मीठ, आलं - लसूण पेस्ट, हळद, बेकिंग सोडा घालावे. आता चमच्याने कालवून सगळे जिन्नस एकजीव करून घ्यावे. ४. आता एका पॅनला तेल लावून त्यावर तयार बॅटरचे गोलाकार डोसे घालावेत. बाजूने तेल सोडून दोन्ही बाजूने डोसा खरपूस भाजून घ्यावा.
उरलेल्या चपात्या आणि डाळीचा मस्त खमंग, मऊसूत डोसा खाण्यासाठी तयार आहे. आपण सॉस किंवा चटणीसोबत हा डोसा खाल्ल्यास त्याची चव अधिकच छान लागते.