उन्हाळ्यामध्ये आपण विविध ज्यूस पितो. फळांचा रस हा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अत्यंत चांगला असतो. शरीरालाही द्रव्याची आवश्यकता असते. (Try making this 'sugarcane juice', drink it at home in summer and stay fresh)त्यामुळे काही खण्यापेक्षा काही तरी पिण्याची इच्छा होते. काही तरी गार प्यायचे मन होत असताना जर ऊसाचे गुराळ दिसले की मग तर सोने पे सुहागा. उन्हाळ्यातच नाही तर इतरही वेळी ऊसाचा रस प्यायला मिळाल्यावर पोटाला आणि मनाला शांत वाटते. (Try making this 'sugarcane juice', drink it at home in summer and stay fresh)इतर फळांप्रमाणे ऊस घरी आणून त्याचा रस काढणे तसे शक्य नाही कारण ऊस फारच कडक असतो. त्याचा रस मिक्सरमधून काढता येणे कठीणच आहे. त्यामुळे आपण इतर फळांचा रस जरी घरी केला तरी ऊसाचा काही करत नाही.
पण तुम्हाला माहिती आहे का? इतर फळांच्या रसापेक्षाही ऊसाचा रस तयार करणे सोपे आहे.(Try making this 'sugarcane juice', drink it at home in summer and stay fresh) घरी ऊसाचा रस तयार करण्यासाठी ऊसाचीही गरज नाही. एक असा पदार्थ वापरायचा आहे जो आपल्या स्वयंपाकघरात असतोच. आपण रोजच्या जेवणासाठी वापरतो. तो पदार्थ म्हणजे गूळ.
ऊसाचा रस उष्णता देऊन आटवला जातो. तो रस गाळून उकळून वाळवून मग त्यापासून गूळाची ढेप तयार केली जाते. त्यामुळे गूळापासून तयार केलेला रस अगदी ऊसाच्या रसासारखाच लागतो. दुपारच्या वेळी घराबाहेर उतरावेसे वाटतच नाही अशा वेळी मग घरीच ऊसाचा रस तयार करता आला तर मज्जाच आहे. तयार करायलाही अगदी ५ मिनिटे पुरेशी आहेत.
साहित्य
गूळ, पुदिना, पाणी, बर्फ, मीठ, लिंबू
कृती
१. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घ्या. अख्खा गूळ घेतला तर तो पातळ होणार नाही.
२. गूळ घेतल्यानंतर त्यामध्ये पुदिन्याची पानेही घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस पिळा. चवीपुरते मीठ घाला. गरजे एवढे पाणी घ्या. थोडा बर्फही टाका म्हणजे रस मस्त थंड होईल.
३. आता ते मिक्सरमधून फिरवून घ्या. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत मिक्सरमध्ये ते मिश्रण फिरवा.
४. ग्लासमध्ये ओतून मस्त आस्वाद घेत प्या. चवीला अगदी गुराळ्यावर मिळणाऱ्या ऊसाच्या रसा सारखाच लागतो.