Join us

ऋषिपंचमी: ऋषीची भाजी करण्याची पाहा परफेक्ट पारंपरिक रेसिपी, एकही मसाला न घालता भाजी होते चविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2025 10:00 IST

Rishi Panchami recipe : Traditional fasting recipes: Rishi Panchami vrat food : ऋषीची भाजी कशी बनवायची यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

आज आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन मोठ्या धुमधडाक्यात, वाजत-गाजतं घरोघरी झालं आहे. दहा दिवसांचा हा उत्साह मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल. या १० दिवसात विविध पदार्थ केले जाते. पण गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी येणार दिवस अर्थात ऋषीपंचमी. (Rishi Panchami recipe) या दिवशी बैलाच्या श्रमाने पिकवलेले धान्य-भाज्या न खाता, आपल्या अंगणात किंवा परसदारात सहज उगवलेल्या किंवा स्वत: पिकवलेल्या भाज्या खाण्याची पद्धत आहे. ऋषींच्या भाजीसोबत वरईची भाकरी, लाल तांदुळाचा भात खाल्ला जातो. (Traditional fasting recipes)भाद्रपद महिन्यातील ऋषी पंचमी या दिवशी ही भाजी विशेषत्वाने केली जाते. यामागचं कारण केवळ चव किंवा आरोग्य नाही, तर त्यामध्ये दडलेली श्रद्धा, शुद्धता आणि कृतज्ञतेची भावना आहे.(Rishi Panchami vrat food) ऋषी पंचमीच्या दिवशी पाळलेले उपवास, शुद्ध अन्न आणि ऋषीची भाजी खाल्ल्याने शरीर शुद्ध होतं आणि मनही शांत राहतं. (Maharashtrian fasting dishes)विशेष म्हणजे, ही भाजी साध्या पद्धतीने, कांदा-लसूण न घालता केली जाते, जेणेकरून ती अधिक सात्विक राहते. ऋषीची भाजी कशी बनवायची यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. 

Ganeshotsav 2025 : मोदकांसाठी उकड कशी काढावी? मोदकांच्या पिठीसाठी कोणता तांदूळ योग्य? लक्षात ठेवा ५ गोष्टी-मोदक परफेक्ट

साहित्य 

तूप - १ चमचा जिरं - १ चमचा हिंग - १ चमचा मिरचीचं वाटण - १ चमचा शेंगदाणे - १ मूठ बारीक चिरलेली पडवळ - अर्धी वाटी दुधी भोपळा - अर्धी वाटी लाल भोपळा - अर्धी वाटी भेंडी - अर्धी वाटीघोसाळं - अर्धी वाटी अळूची बारीक चिरलेली पानेचवळीची बारीक चिरलेली पानेआंबट चुकाची बारीक चिरलेली पानेमीठ - चवीनुसार कणीस शेवग्याची शेंग 

कृती 

1. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये पाणी घाला आणि त्यात एका भांड्यात शेंगदाणे, पडवळ,लाल भोपळा दुधी भोपळा, घोसाळं, कणीस, शेवग्याची शेंग घालून चांगले वाफवून घ्या. 

2. आता कढईत तूप चांगले गरम झाल्यावर त्यात जिरं, हिंग, मिरचीचं वाटणं, शेंगदाणे घालून चांगले परतवून घ्या. त्यात वाफवलेली पडवळ, दुधी भोपळा, घोसाळं, भेंडी, अळूची पाने, चवळीची पाने, आंबट चुकाची पाने घालून वाफेवर चांगले शिजवून घ्या. कणीस आणि शेवग्याची शेंग, वाफवलेले शेंगदाणे घाला. वरुन मीठ घालून चांगले परतवून घ्या. 

3. ऋषीची भाजी ही वाफेवर शिजवली जाते. यामध्ये शक्यतो तेल आणि मीठाचा वापर केला जात नाही. अनेक ठिकाणी ओले खोबरे, चिंचेचा कोळ घालून ही भाजी केली जाते. प्रांत बदलतो तशीच पदार्थांची चव देखील बदलते. 

टॅग्स :अन्नपाककृती