Join us  

Til ka halwa for sankranti: तिळाच्या वड्या- लाडू तर नेहमीच करतो, तिळाचा शिरा केलाय? 'तिल का हलवा' ट्राय करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 7:10 PM

How to make Til ka halwa for sankranti: संक्रांतीला तिळगुळाच्या वड्या, तिळाचे लाडू हे पदार्थ तर आपण नेहमीच करतो. यावर्षी थोडासा बेत बदला आणि संक्रांती स्पेशल तिळाचा हलवा (Til ka halwa recipe) करा.. ही घ्या मस्त रेसिपी..

ठळक मुद्दे ही घ्या तिळाचा हलवा करण्याची सोपी रेसिपी आणि यंदा संक्रांत काळात ट्राय करूनच बघा हा चवदार पदार्थ. 

संक्रांत म्हणजे तिळगुळाचे लाडू, तिळाच्या वेगवेगळ्या प्रकारांनी केलेल्या वड्या, पुरणाच्या पोळीसारखी केलेली तिळगुळाची पोळी.. या पदार्थांची रेलचेल... हे पदार्थ तर आपल्याला आवडतातच आणि आपण वर्षभर या पदार्थांसाठी संक्रांतीची (sankranti special recipe) वाट बघत असतो. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातल्या इतर प्रांतातही हे पदार्थ केले जातातच, पण त्यासोबतच आणखी एक झकास, चवदार पदार्थ संक्रांतीला केला जातो. तो पदार्थ म्हणजे तिळाचा हलवा.. हलवा (sesame halwa) करायला अतिशय सोपा आहे. त्यामुळे ही घ्या तिळाचा हलवा करण्याची सोपी रेसिपी आणि यंदा संक्रांत काळात ट्राय करूनच बघा हा चवदार पदार्थ. 

 

तिळाचा हलवा करण्यासाठी लागणारे साहित्यअर्धा कप तीळ, अर्धा कप रवा, अर्धा कप तूप, एक कप साखर, थोडीशी विलायची पावडर, केशर, गरजेनुसार पाणी.तिळाचा हलवा करण्याची रेसिपी (How to make Til ka halwa)- तिळाचा हलवा करण्यासाठी तीळ ७ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवा.- तीळ भिजल्यानंतर ते मिक्सरमधून काढून घ्या आणि त्याची जाडीभरडी पेस्ट करून घ्या.- आता कढई गॅसवर तापायला ठेवा. त्यात रवा टाका आणि रवा लालसर होईपर्यंत भाजून घ्या.- रवा भाजून झाला की तो ताटात काढून घ्या.

- तापलेल्या कढईत तूप टाका. तूप वितळल्यावर त्यात भाजलेला रवा टाका. रवा तुपात परतून झाला की त्यात तिळाची पेस्ट टाका.- रवा आणि तीळ व्यवस्थित परतून झाले की त्यात एक कप गरम पाणी टाका. पाणी आटत आले की त्यात साखर (साखर नको असल्यास गुळाची पावडर टाकली तरी चालते.), विलायची पावडर आणि केशर भिजवत ठेवलेले पाणी टाका.

- सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या.- आवडीनुसार सुकामेवा टाकून तिळाच्या हलव्याला छानपैकी गार्निशिंग करा.  

सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर (Sanjeev Kapoor) यांनी सांगितलेली तिळाच्या हलव्याची रेसिपी

 

टॅग्स :अन्नपाककृतीमकर संक्रांती